पुणे हादरले! भर चौकात पैलवानाची गोळ्या घालून हत्या, लाईव्ह थरार CCTV त कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 10:18 IST2021-12-24T07:15:51+5:302021-12-24T10:18:31+5:30
ही घटना गुरुवारी (दि.२४) रात्री सव्वानऊच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ घडली.

पुणे हादरले! भर चौकात पैलवानाची गोळ्या घालून हत्या, लाईव्ह थरार CCTV त कैद
शेलपिंपळगाव : शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे भर चौकात एका युवकाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. नागेश सुभाष कराळे ( वय ३८, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
चाकण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (दि.२४) रात्री सव्वानऊच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ घडली. नागेश कराळे हे आपल्या चारचाकी वाहनात बसत असताना लगतच फोर्ड फिगो वाहनात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी नागेशवर चार गोळ्या झाडल्याचे समजते. या घटनेत नागेश गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांची मयत झाल्याचे घोषित केले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल धाव घेऊन पाहणी केली. चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पंचनामा व फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते.
पुण्यातील शेलपिंपळगाव येथील पैलवानाच्या हत्येचा लाईव्ह थरार CCTV मध्ये कैद #Punepic.twitter.com/OprflN3AXH
— Lokmat (@lokmat) December 24, 2021
दरम्यान जुन्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. हल्ल्यात मृत पावलेले नागेश कराळे हे शेलपिंपळगाव येथे कुस्तीची तालीम चालवणारे पैलवान म्हणून परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्या खुनाच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. हल्लेखोरांच्या शोधार्थ पोलिसांची चार पथके रवाना झाली असून काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.