जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 16:26 IST2019-04-10T16:22:52+5:302019-04-10T16:26:06+5:30
उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाची हत्या
उल्हासनगर - जुन्या भांडणाचा रागातून 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाची हत्या आझादनगरमध्ये झाली. ऐन निवडणुकीदरम्यान हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरात हत्यासत्र सुरूच असून गुन्हेगारीच्या संख्येत वाढ झाली आहे. आझादनगर येथे राहणार 16 वर्षाचा सुंदरम रामदुलार निषाद हा मंगळवारी रात्री साडे दहा वाजता प्रबुद्धनगर चौक मध्ये उभा होता. त्यावेळी तेथे आलेल्या बिपीन रामबहाद्दूर यादव याने जुन्या भाडण्याच्या रागातून शिवीगाळ करून धारदार शस्त्राने सर्वांगावर वार केले. गंभीर जखमी झालेला सुंदरम याचा जागीच मुत्यु झाला. घटनेची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. मूर्त सुंदरम याचा रिक्षाचालक भाऊ संजय निशाद यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी बिपीन यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.