अंबाजोगाईत दगड डोक्यात घालून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 13:06 IST2020-06-06T13:04:03+5:302020-06-06T13:06:29+5:30

अंबाजोगाई तालुक्यातील खापरटोनची घटना

Murder of a man by throwing a stone at his head in Ambajogai | अंबाजोगाईत दगड डोक्यात घालून एकाचा खून

अंबाजोगाईत दगड डोक्यात घालून एकाचा खून

अंबाजोगाई : तालुक्यातील खापरटोन येथे एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आज (दि. ६) सकाळी उघडकीस आली. ज्ञानोबा सोपान मुसळे (वय ३५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
 
शनिवारी सकाळी खापरटोन येथील शाळेजवळ पाण्याच्या टाकीच्या बाजूला ज्ञानोबा मृतदेह यांचा मृतदेह आढळून आला. रात्रीतून कधीतरी दुसऱ्या ठिकाणी खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीच्या बाजूला आणून टाकला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा खून कोणी आणि कोणत्या कारणास्तव केला. हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. दरम्यान, बर्दापूर पोलीस घटनास्थळी पोचले असून तपास सुरु आहे.

Web Title: Murder of a man by throwing a stone at his head in Ambajogai