शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इन रिलेशनमधून हत्या; भिवंडीत महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना उत्तरप्रदेश येथून अटक 

By नितीन पंडित | Updated: August 2, 2022 21:11 IST

Murder Case : नारपोली पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक केली असल्याची माहिती मंगळवारी दिली आहे. 

नितिन पंडीत

भिवंडी :  भिवंडी तालुक्यातील वळ पाडा येथील पारसनाथ कंपाऊंड या गोदाम संकुलात ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून गटारीत फेकून दिलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाच्या गुन्ह्याचा तपास करण्यात नारपोली पोलिसांना यश आले असून अनोळखी असलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे .नफिसा मटरु शाह उर्फ संगीता भाभी वय २५ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या सोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या सत्यम सुरेश सिंग वय २४ व त्याचा साथीदार अवधेश श्यामसिंग शैगर वय ३५ यांना नारपोली पोलिसांनीउत्तर प्रदेश येथून अटक केली असल्याची माहिती मंगळवारी दिली आहे. 

२६ जुलै रोजी वळपाडा येथीप पारसनाथ कंपाऊंड येथील एका गोदामा नजीकच्या गटारीत एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. नारपोली पोलिसांनी अज्ञातां विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.सुरवातीला महिलेची ओळख पटली नसताना या भागातील एका व्यक्तीने तो मृतदेह संगीत भाभी हीच असल्याचा सांगत ती सत्यम सिंग या सोबत राहत असल्याचे सांगितले .सदर महिला ही विवाहती असून पती सोबत पटत नसल्याने ती सत्यम सिंग बरोबर लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत असताना सुरवातीला सुरत व तेथून पुन्हा भिवंडी येथे राहण्यास आली होती अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांना मिळताच त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सत्यमचा शोध घेतला असता तो मृतदेह सापडलेल्या परिसरातील गोदामात काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली,त्याचा शोध घेत पोलीस त्याच्या कामाच्या ठिकाणी पोहचले असता सत्यम सिंग व त्याचे मित्र अवधेश, सुमित,मुकेश व विशाल असे कामवर येत नसल्याचे सांगितल्याने पोलिसांचा संशय बळावला.                     

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ ,पो निरीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील व पोना जाधव, पाटील, बंडगर या पथकाने तांत्रिक कौशल्याने तपास केला असता सत्यम सिंग हा उत्तर प्रदेश येथे निघून गेल्याचे निष्पन्न झाले असता हे पोलीस पथक उत्तर प्रदेश राज्यातील रसुलाबाद, फत्तेपुर या ठिकाणी दाखल होत स्थानिक पोलिसांच्या मदतीने सत्यम सुरेश सिंग व त्याचा साथीदार अवधेश श्यामसिंग शैगर यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली.कोणताही पुरावा नसताना माहितीच्या आधारे तांत्रिक तपास करीत आरोपीस अटक करण्यात नारपोली पोलिसांना यश मिळाले असून या दोन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता १०ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली आहे .

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशbhiwandiभिवंडी