शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

पुणे : मैत्रिणीला अपशब्द वापरल्याच्या रागातून मित्रांनीच केला खून ; चार जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 15:12 IST

सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे २४ तासाच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली.

पुणे ( खडकवासला ) : मैत्रिणीला अपशब्द वापरल्याच्या रागातून मित्रांनी मित्राला मारहाण करुन त्याचा काटा काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यश मिलिंद कांबळे (वय १८, रा. नांदेड) याच्या खुनाचे गुढ उकलण्यात हवेली पोलिसांना यश आले असून त्यांनी चौघांना अटक केली आहे.

मदन शाम गेंटाल (वय २४,रा. गिताजली अपार्टमेंट, नांदेड फाटा, सिंहगड रोड ), चमन नईम बागवान (वय १८, रा. गौरी बिल्डींग,सावंत पार्क, नांदेड, तालुका हवेली), सुमित गंगाधर शेजवळ (वय २२, रा. शेजवळ हाईट्स, नांदेड), आकाश दत्तात्रय घाडगे( वय २०, रा़ मातोश्री निवास, नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आलेल्या आरोपींचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आकाश घाडगे याला ताब्यात घेतल्यानंतर डीएसके विश्व येथे लपुन बसलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश कांबळे याचा मृतदेह नांदेड फाटा येथे शनिवारी सकाळी आढळून आला होता. मदन शाम गेंटाल याचे नांदेड फाट्याजवळ राहणाऱ्या एका मुलीबरोबर प्रेम सबंध आहे. तीच मुलगी मला भेटत असल्याचे यश कांबळे याने काही दिवसांपूर्वी चमन बागवान याला सांगितले होते. ही माहिती चमन याने मदन गेंटाल, सुमित शेजवळ आणि आकाश घाडगे याला सांगितले. शनिवारी रात्री एकच्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या चौघांनी यश कांबळे यास नांदेड फाटा येथे बोलवून घेतले. त्यानंतर पाचही जण समीर शेजवळ याच्या नांदेड फाट्याजवळ असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेले. दारूच्या नशेत असलेल्या चौघांनी यश कांबळे यास लाकडी दांडक्याने आणि हाताने जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी यशने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्यात जबर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यु झाला़ यशची हालचाल थांबल्याचे पाहून आरोपी फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक शेळके तातडीने सहायक पोलिस निरीक्षक नितीन नम, पोलीस उपनिरिक्षक ॠतुजा मोहिते, पोलीस नाईक रामदास बाबर, संजय शेंडगे, गणेश धनवे, राजेंद्र मुंडे, संतोष भापकर, दिनेश कोळेखर, विश्वास मोरे व होमगार्डचे जवान यांचेसह घटनास्थळी दाखल होउन तपास सुरु केला. पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाला गती दिली.  सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे २४ तासाच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सई भोरे पाटील अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMurderखूनCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस