खुटाळा येथे शेत रखवालदाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 21:28 IST2021-01-12T21:27:51+5:302021-01-12T21:28:20+5:30
Murder : याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

खुटाळा येथे शेत रखवालदाराचा खून
ठळक मुद्दे कळंबचे ठाणेदार अजित राठोड यांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
कळंब (यवतमाळ) : शेत रखवालदाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. नामदेव गोदरू पेंदाम (५२, रा.वाऱ्हा कोटी, ता. राळेगाव) असे मृताचे नाव आहे. नामदेव पेंदाम हा गजानन चिव्हाणे यांनी खुटाळा शिवारात मक्त्याने घेतलेल्या शेतात रखवालदार होता. शेतातच त्याचे वास्तव्य होते. सोमवारी रात्री त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कळंबचे ठाणेदार अजित राठोड यांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.