Murder of a disabled woman by sexual assault | लैंगिक अत्याचार करून दिव्यांग महिलेची हत्या
लैंगिक अत्याचार करून दिव्यांग महिलेची हत्या

बुलडाणा: खेर्डा येथील अविवाहित दिव्यांग महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ठसे तज्ज्ञ, डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक नमुने घेणाऱ्या पथकाने आनुषंगिक नमुने घेतले असून, श्वानाने थेट आरोपीचे घर गाठल्याने अत्याचार करणाºयास दुपारी २ वाजेच्या दरम्यान अटक करण्यात आली.

रितेश गजानन देशमुख (३०)असे आरोपीचे नाव असून, पीडित महिलेच्या घराजवळच तो राहत होता. दिव्यांग महिला चुलत भावाच्या घरालगत राहत होती. या घराचे बांधकाम सुरू असून, दरवाजेही लावलेले नाहीत. शुक्रवारी त्याने मद्य प्राशन करून गावात आणि घरी गोंधळ घातला.

मध्यरात्री तो पीडित महिलेच्या घरात शिरला व त्याने लैंगिक अत्याचार केला. त्यास पीडितेने प्रतिकार केला असता तेथे असलेल्या काठीने दिव्यांग महिलेस मारहाण केली. त्यातच गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. या कृत्याबाबत आरोपीने त्याच्या पत्नीकडे लैंगिक अत्याचार व खून केल्याची कबुली दिली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. अद्याप मृत महिलेच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला नसला तरी सकृतदर्शनी लैंगिक अत्याचार करून दिव्यांग महिलेची हत्या झाल्याच्या बाबीस त्यांनी पुष्टी दिली.

ज्युलीमुळे आरोपीचा छडा

दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान डॉग स्कॉडमधील ज्युली नावाची कुत्री, ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक सायन्स पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वानास घटनास्थळी पडलेल्या राफ्टरचा वास दिल्यानंतर श्वानाने थेट तीन घरे सोडून असलेल्या रितेशच्या घराचा रस्ता दाखविला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. रितेशने वापरलेले कपडेही रात्रीच धुतले होते. श्वानाने थेट त्याचे घर गाठत त्याचे हे कपडेही शोधल्याचे स्थानिकांनी सांगितले.

लैंगिक अत्याचार करून दिव्यांग अविवाहित महिलेचा आरोपीने खून केल्याचे तपासात समोर येत आहे. आरोपीने त्याच्या पत्नीजवळही या कृत्याची कबुली सकाळी दिल्याचेही समोर येत असून, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर बºयाच बाबी स्पष्ट होतील.
-डॉ. दिलीप भुजबळ, पोलीस अधीक्षक, बुलडाणा

डांबून ठेवलेल्या बालिकेवर अत्याचार

जालना : फूस लावून पळवून नेलेल्या १३ वर्षीय मुलीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जालना तालुक्यातील सुंदरनगर येथून २३ दिवसांपूर्वी पळवून नेलेल्या मुलीची चंदनझिरा पोलिसांनी शुक्रवारी सेनगाव (जि.हिंगोली) शिवारातील शेतवस्तीतून सुटका केली. तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे.
च्पथकाने सेनगाव येथील शेतवस्तीवर धाड मारुन मुलीची आरोपींच्या ताब्यातून सुटका केली व दत्ता धनगरला जेरबंद केले. पळवून नेल्यानंतर दोन- तीन दिवसांत लग्न लावण्याची तयारी आरोपींनी सुरू केली होती, अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली.

Web Title: Murder of a disabled woman by sexual assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.