शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कुख्यात गुंड महाकालीच्या भावाचा वाकड परिसरात खून; मित्रानेच केले वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 11:48 IST

तडीपारीचा भंग करुन आला होता वाकडमध्ये, दारूच्या नशेत झाला वाद दोस्ताने केले वार

ठळक मुद्देमनोज ऊर्फ डिंगर्‍यावर ९ गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद

पुणे :  पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड महाकालीच्या भावाच्या लाकडी दांडक्याने वार करुन निर्घृणपणे खून करण्याचा प्रकार समोर आला आहे. मनोज ऊर्फ डिंगर्‍या ढकोलिया असे या गुंडाचे नाव आहे. वाकड परिसरातील पुनावळे येथील लंडन पुलाखाली रविवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. कुख्यात गुंड महाकाली ऊर्फ राकेश ढकोलिया याचा २०१० मध्ये एन्काऊंटर करण्यात आला होता. त्यानंतर महाकाली टोळीचा कारभार मनोज पाहू लागला होता. मनोज ऊर्फ डिंगर्‍यावर ९ गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद असून त्याला तडीपार करण्यात आले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन तो पिंपरी चिंचवड शहरात आला होता. मनोज आणि आदम ऊर्फ गोट्या खान हे दोघे रविवारी रात्री दारु पिण्यासाठी पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली बसले होते. दारु पित असताना त्यांच्यात भांडणे झाली. यावेळी आदम याने लाकडी दांडक्याने डिंगर्‍याच्या डोक्यात मारहाण केली. त्यात डिंगर्‍या गंभीर जखमी झाला. त्यानंतर आदम तेथून पळून गेला. याची माहिती वाकडपोलिसांना मिळल्यावर ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी डिंगर्‍याला त्वरीत रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. पोलिसांनी आदम खान याला ताब्यात घेतले आहे. आदम खान याच्याविरुद्धही गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेwakadवाकडMurderखूनPoliceपोलिस