शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

एमजीरोडवर सराईत गुन्हेगाराचा भोसकून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 11:32 PM

एमजीरोड येथे शिवाजी स्टेडियमच्या प्रवेशद्वार जवळील बोळीत एका सराईत गुन्हेगारावर धारधार शस्त्राने चौघांनी हल्ला चढवून खून केल्याची घटना घडली.

नाशिक : एमजीरोड येथे शिवाजी स्टेडियमच्या प्रवेशद्वार जवळील बोळीत एका सराईत गुन्हेगारावर धारधार शस्त्राने चौघांनी हल्ला चढवून खून केल्याची घटना घडली.शहरातील एमजीरोड हा गजबजलेला परिसर रात्री साडे नऊ वाजेनंतर शांत होताच पावणे दहा वाजेच्या सुमारास मनीष प्रेमजी रेवर (२९, रा.रामवाडी) यास बोलावून घेत त्याच्या डोक्यात, मानेवर धारदार शस्त्राने हल्लेखोरांनी वार केले. या हल्ल्यात रेवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. दरम्यान, त्याच्या काही मित्रांना माहिती समजल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्यास खासगी रुग्णालयात हलविले; मात्र अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर रेवर यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या खुनाच्या गुन्ह्यात एकूण चार संशयितांची नावे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये एक संशयीत हद्दपार केलेला गुन्हेगार असल्याचे समजते. रेवर याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरीष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी, सहायक निरीक्षक विलास शेळके जिल्हा रुग्णालयात फौजफाट्यासह दाखल झाले. जिल्हा रुग्णालयात जमा झालेल्या गर्दी पंगविली. जुन्या गुन्हेगारी वादातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पंचवटी रामवाडी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रात्रभर परिसर पिंजत होते. सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी