शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

हत्येप्रकरणी सौदीत दोन भारतीयांचा शिरच्छेद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 19:23 IST

शिरच्छेद झाल्यावर सौदी प्रशासनाने मात्र याबाबत काही माहिती भारत सरकारला कळवली नव्हती. 

ठळक मुद्देहरजीत ,सत्विंदर आणि इमामुद्दीन या तिघांनी सौदीतील हायवेवर लुटमार केली होती. पैशांच्या वाटपावरून भांडण झाल्यामुळे त्यांनी इमामुद्दीनची हत्या केली होती. इमामुद्दीन या त्यांच्या भारतीय सहकाऱ्याची इतर दोघांनी मिळून हत्या केल्याचे समोर आले. २८ फेब्रुवारी २०१९ला त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

चंदिगढ - आपल्याच भारतीय सहकाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी पंजाबमधील होशियारपूरच्या सत्विंदर कुमार आणि लुधियानाच्या हरजीत सिंग या दोघांचा शिरच्छेद करण्यात आला आहे. याबाबत माहिती भारतीय दुतावासाने दोघांच्याही कुटुंबीयांना दिली आहे. शिरच्छेद झाल्यावर सौदी प्रशासनाने मात्र याबाबत काही माहिती भारत सरकारला कळवली नव्हती. हरजीत ,सत्विंदर आणि इमामुद्दीन या तिघांनी सौदीतील हायवेवर लुटमार केली होती. पैशांच्या वाटपावरून भांडण झाल्यामुळे त्यांनी इमामुद्दीनची हत्या केली होती. काही दिवसांनंतर हरजीत सिंग आणि सत्विंदर कुमार यांना दारू पिऊन मारामारी केल्याप्रकरणी सौदी पोलिसांनी अटक केली होती. या तिघांना भारतात परत पाठवण्याची तयारी सुरु असताना इमामुद्दीन या त्यांच्या भारतीय सहकाऱ्याची इतर दोघांनी मिळून हत्या केल्याचे समोर आले. दोघांनाही तात्काळ रियाधला पाठविण्यात आले. त्यांच्यावर चालवण्यात आलेल्या खटल्यावर भारतीय दुतावासाचे लक्ष होते. फेब्रुवारीत त्यांना शिरच्छेदाची शिक्षा सुनावण्यात आली. २८ फेब्रुवारी २०१९ला त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. मात्र, याची माहिती भारतीय दुतावासाला देण्यात आली नाही. सत्विंदरबाबत काहीच माहिती न मिळाल्याने त्याची पत्नी सीमारानी हिने परराष्ट्र मंत्रालयात अर्ज दाखल केला. यानंतर भारतीय दुतावासाने सौदी प्रशासनाशी संपर्क साधून माहिती मिळवली, त्यावेळी दोघांना मृत्युंदंडाची शिक्षा केल्याचे उघड झाले. दोघांचेही मृतदेह मिळवण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण सौदी कायदा याची परवानगी देत नसल्यामुळे सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने मृतदेह भारतात पाठवण्यास नकार दिला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsaudi arabiaसौदी अरेबियाIndiaभारतMurderखून