जुहूमध्ये बांधकाम व्यावसायिकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 05:09 IST2020-08-18T05:09:40+5:302020-08-18T05:09:47+5:30

या प्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.

Murder of a builder in Juhu | जुहूमध्ये बांधकाम व्यावसायिकाची हत्या

जुहूमध्ये बांधकाम व्यावसायिकाची हत्या

मुंबई : जुहूमध्ये सोमवारी पहाटे बांधकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.
जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल शेख (५५) असे मृताचे नाव आहे. त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास शेख नमाज अदा करण्यासाठी अंधेरी पश्चिमच्या सोफी हाउस येथे गेले होते. त्याचवेळी अज्ञाताने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. शेख हे अभिलेखावरील गुन्हेगार असून त्यांच्यावर फसवणुकीचे चार ते पाच गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी मुन्ना नामक इसमावर संशय असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Murder of a builder in Juhu