शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

हत्येच्या आरोपातील गुन्हेगाराची मेडिकलमधून धूम; पोलिसांची भागमभाग 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 8:09 PM

मेडिकलमधून पळून गेलेल्या शोएबला शोधण्यासाठी शहर पोलिसांची यंत्रणा धावपळ करीत होती. शोएब रेल्वेस्थानकाजवळ, कॉटन मार्केटच्या परिसरात सकाळपासून भटकंती करत होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - कर्करोगाच्या उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केलेल्या एका हत्येच्या आरोपातील कैद्याने पोलिसांची नजर चुकवून रविवारी सकाळी धूम ठोकली. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली. तब्बल ८ तास भागमभाग केल्यानंतर पळून गेलेल्या कैद्याला आरोपी सेलच्या पोलीस पथकाने शोधून काढले.

सोनू उर्फ सोहेल उर्फ शोएब खान बब्बू खान (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो ताजबाग, सक्करदरामधील रहिवासी आहे. कोरोनाचा सर्वत्र कहर असताना गेल्या वर्षी आरोपी शोएबने धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाची हत्या केली होती. पोलिसांनी अटक करून चाैकशी केल्यानंतर त्याला मध्यवर्ती कारागृहात डांबले. ३१ जुलै २०२० पासून तो कारागृहात आहे.

दरम्यान, त्याला कर्करोग झाल्याने मेडिकलच्या वार्ड नंबर १९ मध्ये दाखल करण्यात आले होते. सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान त्याने नैसर्गिक विधीसाठी गर्दी झाल्याची संधी साधून शोएबने मेडिकलमधून धूम ठोकली. ते लक्षात आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना तसेच गुन्हे शाखेच्या विविध तपास पथकांना देण्यात आली. पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त संदीप पखाले, एसीपी विलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी सेलचे एपीआय राजकुमार वानखेडे, एएसआय रतन उंबरकर यांनीही आपल्या चमूंना शोएबला शोधण्यासाठी कामी लावले.

कॉटन मार्केटमध्ये भटकंतीमेडिकलमधून पळून गेलेल्या शोएबला शोधण्यासाठी शहर पोलिसांची यंत्रणा धावपळ करीत होती. तर, शोएब रेल्वेस्थानकाजवळ, कॉटन मार्केटच्या परिसरात सकाळपासून भटकंती करत होता. दुपारी ३ वाजता तो पोलिसांना आढळला. त्याला ताब्यात घेऊन एपीआय वानखेडे, एएसआय रतन उंबरकर, नुसार हवलदार मंगेश जुगादे, शाम मिश्रा, अंमलदार प्रफुल्ल बोरकर, अभय मारोडे, रोशन निंबर्ते, पंकज चिव्हाणे, अश्विन सोमकुंवर यांनी वरिष्ठांसमोर हजर केले. नंतर त्याच्याविरुद्ध हवलदार रामनरेश लक्ष्मण जयस्वाल यांनी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी