शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पत्नीसह चिमुकल्या मुलीची केली हत्या, मृतदेहाचे तुकडे - तुकडे करून भरले गोणीत अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 9:31 PM

Double Murder : गावकऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.

ठळक मुद्देही थरारक घटना रीवा मुख्यालयापासून 70 किमी दूर मऊगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

भोपाळ -  मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने क्रुरपणे पत्नी आणि मुलीची हत्या केली. इतक्यावरच न थांबता त्याने दोघींचे मृतदेहाचे तुकडे तुकडे करून एका गोणीत भरले. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह 24 तास एका खोलीत ठेवले. ही थरारक घटना रीवा मुख्यालयापासून 70 किमी दूर मऊगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.आरोपीच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती. यानंतर त्याने विधवा वहिनी प्रमिलासोबत दुसरं लग्न केलं. दोघांना 1 वर्षांची काजल नावाची मुलगी देखील होती. छिंदलाल साकेत याने हत्या केल्यानंतरही कोणालाही संशय येऊ नये म्हणून तो सर्वसामान्यपणे वागत होता. आरोपी गुरुवारी रात्री अंधारात गोणी फेकण्याच्या तयारीत होता. त्यादरम्यान गावकऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.मृत महिलेच्या मुलाने सांगितले की, वडील दारू आणि अंडी घेऊन आले होते. दारू प्यायले आणि त्यानंतर आम्हाला घराबाहेर काढलं. एसपी रीवा राकेश कुमार सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात या हत्येमागे मोठा कट असल्याची शक्यता आहे. आरोपीच्या पहिल्या पत्नीची आत्महत्यादेखील संशयाच्या फेऱ्यात आहे. आरोपीच्या मोठ्या भावाचाही मृत्यू झाला आहे आणि भावाच्या मृत्यूनंतर त्याने वहिनीशी लग्न केलं आहे, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश