Raj Kundra: 'राज कुंद्रा काय दहशतवादी आहे का?', जामीन नाकारल्यावर वकिलाचा भर कोर्टात सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 03:23 PM2021-07-28T15:23:11+5:302021-07-28T17:08:53+5:30

Court rejects bail pleas of Raj Kundra : पोर्नोग्राफी प्रकरणातील आरोपी राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांच्या जामीन याचिका मुंबईच्या एस्प्लानेड कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे त्यांची जेलमधून सुटका होण्याच्या मार्गात अडचण आली आहे. 

Mumbai's Esplanade Court rejects bail pleas of Raj Kundra and Ryan Thorpe in pornography case | Raj Kundra: 'राज कुंद्रा काय दहशतवादी आहे का?', जामीन नाकारल्यावर वकिलाचा भर कोर्टात सवाल

Raj Kundra: 'राज कुंद्रा काय दहशतवादी आहे का?', जामीन नाकारल्यावर वकिलाचा भर कोर्टात सवाल

Next

मुंबई : पोर्नोग्राफीक फिल्म्सची निर्मिती करून तिचे वितरण केल्याप्रकरणी आरोपी असलेले व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला काल तातडीने दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. सरकारी वकिलांची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही दिलासा देणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. पोर्नोग्राफी प्रकरणातील आरोपी राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांच्या जामीन याचिका मुंबईच्या एस्प्लानेड कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे त्यांची जेलमधून सुटका होण्याच्या मार्गात अडचण आली आहे. जामीन फेटाळल्यानंतर कुंद्राच्या वकिलाने कोर्टाला तो दहशतवादी आहे का ? असा सवाल केला. 

राज कुंद्रा याने त्याच्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर २९ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्या. अजय गडकरी यांच्या एकलपीठाने पोलिसांना दिले होते. राज कुंद्रा यांना मुंबई क्राईम ब्रँचने १९ जुलै रोजी अटक केली. अटकेनंतर दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 

 

काल पार पडलेल्या सुनावणीत कुंद्रा यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले की, कुंद्रा यांची अटक बेकायदेशीर आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केले नाही. सीआरपीसी कलम ४१ (ए) अंतर्गत कुंद्रा यांना आधी नोटीस बजवायला हवी होती. त्यानंतर त्यांना अटक करायला हवी होती. मात्र, पोलिसांनी नोटीस बजावण्याची कायदेशीरप्रक्रिया डावलून कुंद्रा यांना थेट अटक केली.  मात्र, मुख्य सरकारी वकील अरुणा पै- कामत यांनी हा आरोप फेटाळला होता. पोलिसांनी कुंद्रा यांना नोटीस बजावूनच अटक केली, असे पै- कामत यांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यावर न्यायालयाने सरकारी वकिलांना या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. पोंडा यांनी तोपर्यंत कुंद्रा यांना अंतरिम दिलासा देण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली होती.

 

सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकल्याशिवाय एकतर्फी अंतरिम दिलासा देणारी नाही, असे न्या. गडकरी यांनी म्हटले होते. पोलीस ज्या गोष्टी पोर्नोग्राफिक असल्याचा दावा करत आहेत त्यामध्ये थेट लैंगिक दृश्ये किंवा शारीरिक संबंध दाखविण्यात आलेले नाहीत.एखाद्या लघुपटात प्रणय दृश्ये दाखविण्यात येतात तशी आहेत. ती दृश्ये पाहणारा फारतर कामातुर होऊ शकतो. त्यामुळे पोलीस माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ (ए)  आपल्यावर लावू शकत नाहीत. फारतर कलम ६७ (कामातुर कंटेट प्रसिद्ध करणे) अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते, असे याचिकेत म्हटले होते. कुंद्रा यांच्या अटकेनंतर क्राईम ब्रँचने कुंद्रा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. कुंद्रा यांच्या कार्यालयावर घातलेल्या धाडीत ५१ अश्लिल व्हिडीओ जप्त केल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.

Web Title: Mumbai's Esplanade Court rejects bail pleas of Raj Kundra and Ryan Thorpe in pornography case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app