शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Video : मुंबई सुरक्षित आहे, होती आणि नेहमी असणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 17:18 IST

नवविर्वाचीत मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचे प्रतिपादन 

ठळक मुद्देमुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.रेल्वे पोलीस, हवाई सुरक्षा दल तसेच अन्य तपास यंत्रणाच्या मदतीने सुरक्षेची काळजी घेत आहोत.

मुंबई - मुंबई सुरक्षित आहे, होती आणि नेहमी असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करू नये. मुंबई पोलीस नेहमीच तुमच्यासोबत आहेत, असे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर नवविर्वाचीत पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सांगितले. त्याचबरोबर मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुंबई पोलीस दल असो, एटीएस असो राज्य पोलीस दल असो सर्वाचं एकाच ध्येय आहे सुरक्षेचं आणि वर्दीचा खाकिचा रंगही एकच आहे. त्यामुळे आम्ही  सर्व पोलीस एक आहोत. पुलवामा हल्ल्यानंतर सध्याची परिस्थिती लक्षात घेता रस्त्यावरिल बंदोबस्ताकड़े विशेष लक्ष असणार आहे. रेल्वे पोलीस, हवाई सुरक्षा दल तसेच अन्य तपास यंत्रणाच्या मदतीने सुरक्षेची काळजी घेत आहोत. दिवसेंदिवस सायबर गुन्हे वाढ़त आहेत. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढ़ण्यासाठी प्रयत्न असेन असेही बर्वे यांनी यावेळी नमूद केले.

कोण आहेत संजय बर्वे?मुंबईचे ४२ वे आयुक्त बनलेले संजय बर्वे हे १९८७ च्या बॅँचचे आयपीएस अधिकारी असून यापुर्वी उपायुक्तपद ते सहआयुक्त पदापर्यत मुंबई पोलीस दलातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. मुंबई वाहतुक शाखेत २००९ -१० मध्ये काम पाहताना महानगरातील वाहतुक व्यवस्थेला खऱ्या अर्थाने वेगळे वळण लावले होते. य काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस अकादमीचे संचालक, राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त, सुरक्षा महामंडळाचे कार्यकारी संचालक व एसीबीचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. गेली पाच महिने १० दिवस एसीबीचे महासंचालक म्हणून काम पहाताना भ्रष्ट लोकसेवकावर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामध्ये मुंबईतील लाचखोर पोलिसांवर अनेक कारवाई केल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईची धुरा सांभाळताना भ्रष्ट पोलिसांची साफसफाई अधिक गतीने होईल, अशी अपेक्षा आहे.पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत बर्वे यांचे नाव अहमद जावेद यांच्यानंतर चर्चेत होते. मात्र अंतिम क्षणी त्यांना या पदाने हुलकावणी दिली होती. अखेर सेवानिवृत्तीला ६ महिन्याचा कालावधी शिल्लक असताना त्यांना या पदाने गवसणी घातली. देशात वादग्रस्त ठरलेल्या कुुलाब्यातील आदर्श सोसायटी घोटाळ्यात बर्वे यांच्या वडीलांच्या नावे फ्लॅट होता. त्यामुळे सीबीआयने त्यांच्याकडेही चौकशी केल्यानंतर त्यांना क्लिनचिट’ दिली होती. ३० सप्टेंबरला ते सेवानिवृत्त होणार असून तत्कालिन परिस्थितीनुसार त्यांना राज्य सरकारकडून ३ महिन्याची मुदतवाढ मिळू शकते. 

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तMumbaiमुंबई