Mumbai Rave Party Case: आर्यन खानसोबत अटक झालेल्या मुनमुन धामेचाच्या घरी चोरीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 12:06 PM2021-10-07T12:06:47+5:302021-10-07T12:07:49+5:30

Mumbai Cruise Drugs Case: मुनमुन धामेचा (Munmun Dhamecha) ही सध्या दिल्लीला राहते. पण तिचं वडिलोपार्जित घर सागरमध्ये आहे. तिच्या घरात चोर घुसल्याची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

Mumbai Rave Party Case: Arrested Model Munmun Dhamecha house attacked by Theif | Mumbai Rave Party Case: आर्यन खानसोबत अटक झालेल्या मुनमुन धामेचाच्या घरी चोरीचा प्रयत्न

Mumbai Rave Party Case: आर्यन खानसोबत अटक झालेल्या मुनमुन धामेचाच्या घरी चोरीचा प्रयत्न

Next

मुंबई क्रूझ ड्रग्स केस (Mumbai Drug Case) प्रकरणात NCB टीमने बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Arrest In Drug Case) ला अटक केली आहे. NCB टीमने त्याच्यासोबत आणखी तीन लोकांना अटक केली होती. ज्यात मध्य प्रदेशमधील सागरची मॉडल मुनमुन धामेचा (Munmun Dhamecha) ही सुद्धा आहे. सागर शहरातील यादव कॉलनीमध्ये मुनमुनचं घर आहे. इथे काही लोकांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. 

मॉडल मुनमुनही NCB च्या ताब्यात

मुनमुन धामेचा ही सध्या दिल्लीला राहते. पण तिचं वडिलोपार्जित घर सागरमध्ये आहे. तिच्या घरात चोर घुसल्याची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण तोपर्यंत चोर फरार झाले होते. मुंबईच्या क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सोबत मुनमुन धामेचा पकडली गेली होती. 

मुनमुनचं घर सागरच्या यादव कॉलनीत आहे. मुनमुन आईच्या निधनानंतर तिचा भाऊ इथे राहतो. पण तोही सध्या शहराच्या बाहेर आहे आणि घराला लॉक लावलेलं आहे. बुधवारी रात्री साधारण ११ वाजता मुनमुन धामेचाच्या घराचा दरवाजा तोडण्याचा आवाज शेजाऱ्यांना ऐकू आला. ज्यानंतर शेजारी जोरात ओरडले. आवाज ऐकून चोर तेथून फरार झाले.

भावाला दिली सूचना

सांगितलं जात आहे की, चोरीची सूचना तिचा भाऊ प्रिन्स धामेचा याला फोनवर देण्यात आली. त्यानंतर तो पोलिसांसोबत बोलला. मुनमुनच्या घराबाहेर दोन गेट आहेत. आधी चोरांनी पहिल्या गेटचं लॉक प्लायच्या मदतीने तोडण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा ते लॉक तुटलं नाही तर चोरांनी खोदकामासाठी वापरला जाणाऱ्या रॉडने लॉकवर वार केला. 

लॉक तुटण्याआधी शेजाऱ्यांनी आरडाओरड केली आणि चोर ठिकाणावरून पळून गेले. आरोपींनी घराबाहेरच्या मीटरमधून लाइट कनेक्शन बंद केलं होतं. त्यानंतर त्यांनी अंधारात लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. सूचनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.  ते पुढील कारवाई करत आहेत.
 

Web Title: Mumbai Rave Party Case: Arrested Model Munmun Dhamecha house attacked by Theif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app