शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांवरील अत्याचारांत मुंबई तिसऱ्या स्थानी; १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा; महाराष्ट्रात वृद्ध असुरक्षितच; एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 09:41 IST

महाराष्ट्रातील वृद्ध असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या  (एनसीआरबी) अहवालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील वृद्ध असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या  (एनसीआरबी) अहवालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यात मध्य प्रदेशने आघाडी गाठली आहे, तर त्यापाठोपाठ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून, त्यात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

एनसीआरबीने २०२३मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जारी केली. यात अन्य राज्यांच्या तुलनेत ज्येष्ठांंवरील अत्याचारात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.  संपूर्ण देशात वृद्धांवरील अत्याचाराचे एकूण २७,८८६ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ५ हजार ११५ गुन्ह्यांची नोंद आहे. पहिल्या क्रमांकावर मध्य प्रदेश (५,७३८) आहे. २०२३मध्ये राज्यात  १९० वृद्धांंच्या हत्येची नोंद केली आहे. दरोड्याच्या ११ घटना समोर आल्या, तर वृद्धांंना लक्ष्य करत  चोरीचे १,२४३ गुन्हे नोंद झाले असून, जबरी चोरीच्या ३२६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वृद्धांंच्या विनयभंगाच्या ६१, तर बलात्काराचे ४ गुन्हे घडले आहेत. शिवाय फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमध्येही ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसताहेत.  एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून, त्यात राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांचा  समावेश आहे. 

मुंबईत ५१८ गुन्हे नोंद झाले आहेत. २०२२मध्ये हाच आकडा ५७२  होता, तर २०२१ मध्ये ९८७ गुन्ह्यांची नोंद पोलिस दप्तरी झाली होती. दिल्ली (१,३६१), कर्नाटक बंगळुरू (६४९)  नंतर मुंबईचा क्रमांक लागतो. मुंबईत ५ हत्याची नोंद झाली झाली. दोषारोपपत्र दर ३८.५ टक्क्यांवर आला आहे.

पोलिसांचा असाही आधारघरात एकट्या असलेल्या वृद्धांना घरातल्या रेशनिंगपासून गॅस, लाइटबिल, औषध आणून देण्यासाठी पोलिस पुढाकार घेताना दिसत आहेत. यामुळे त्यांच्यातील नाळ अधिक घट्ट होताना दिसत आहे. मुंबईत एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आजी - आजोबांची माहिती पोलिस दप्तरी नोंद आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठीसह त्यांच्या प्रत्येक कॉलला मुंबई पोलिस मदतीसाठी धावून जात आहेत.

चढता आलेख      प्रकार              दाखल        पीडित     हत्या                    १९०           १९६ हत्येचा प्रयत्न         ८५            ८७ छेडछाड              ६१             ६१ अपहरण              १०             १० बलात्कार              ४              ४चोरी                   १,२४३     १,२४३ खंडणी                 २९           २९ जबरी चोरी          ३२६        ३२७ दरोडा                  ११            १३ फ्रॉड                   ८६३        ८६६

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai ranks third in crimes against elderly; Maharashtra insecure.

Web Summary : Maharashtra ranks second in crimes against the elderly, behind Madhya Pradesh, according to NCRB data. Mumbai is third among 19 cities. In 2023, Maharashtra recorded 5,115 cases of crimes against senior citizens, including 190 murders, thefts, fraud and cybercrimes.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र