Mumbai police busted high-profile sex racket | हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश; मराठी अभिनेत्रीचा समावेश

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश; मराठी अभिनेत्रीचा समावेश

ठळक मुद्देमुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. प्रिया शर्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे रेवले यांनी सांगितले. 

मुंबई - मुंबई पोलिसांनी अंधेरी पूर्वेकडील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये चालविले जाणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उध्वस्त केले आहे. पोलिसांनी छापा टाकून २९ वर्षीय महिलेला अटक करण्यात आले आहे. तसेच तीन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. सुटका केलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसातील ही तिसरी कारवाई आहे. या तिन्ही प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन असल्याचे पाहायला मिळत आहे.  

धक्कादायक! बॉलिवूडचा कास्टिंग डायरेक्टर चालवत होता सेक्स रॅकेट


समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यादरम्यान एका अल्पवयीन मुलीसह तीन महिला आढळून आल्या. त्यांची सुटका करण्यात आली. तर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडणाऱ्या प्रिया शर्माला बेड्या ठोकण्यात आल्या. शर्मा ही कांदिवली पूर्व येथे टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्सी चालवते. तसेच ती सेक्स रॅकेट देखील चालवत असल्याची माहिती मिळाली होती.

जुहूतील हॉटेलमधील बॉलिवूडचे कनेक्शन असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड 

महत्वाचे म्हणजे एका क्राईमच्या हिंदी मालिकेत काम केलेल्या अभिनेत्रीची देखील या सेक्स रॅकेटमधून पोलिसांनी सुटका केली आहे. ती गायिका देखील आहे. तर सुटका केलेली दुसरी अभिनेत्रीने मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. तर पोलिसांनी सुटका केलेल्या अल्पवयीन कलाकाराने वेबसिरीजमध्ये अभिनय केला आहे. प्रिया शर्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे रेवले यांनी सांगितले. 

Web Title: Mumbai police busted high-profile sex racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.