शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्रदिनी सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 20:29 IST

मुंबईत ४० हजार पोलिसांचा फौजफाटा उद्या सुरक्षेसाठी सज्ज झाला आहे.  

ठळक मुद्देअनेक राजकीय पक्षांची कार्यालये त्याचप्रमाणे, शहरातील संवेदनशील भागात देखील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ध्या वेशात पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली असून  दुसरीकडे राज्य एटीएसने काही संशयीतांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई - जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढल्याने ७२ वर्षानंतर प्रथमच संपूर्ण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होणार असून या स्वातंत्र्य दिनावर दहशतवादी हल्याचे सावट आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईसह राज्यात आणि देशात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. रेल्वे स्थानक, मंदीरे, शाळा-महाविद्यालयात चौवीस तास बंदोबस्त तैनात करण्या बरोबरच नाकांबदी देखील ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणव अशोक यांनी दिली. मुंबईत ४० हजार पोलिसांचा फौजफाटा उद्या सुरक्षेसाठी सज्ज झाला आहे.  

त्याचप्रमाणे राज्य एटीएस, फोर्स वन, श्वान पथक, शीघ्रकृती दल, वाहतूक विभाग, राज्य राखीव दल, सशस्त्र दल, होमगार्ड्स आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातच केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याचे कलम ३७० मधील काही अनुच्छेद तसेच ३५ अ कलम रद्द केल्याने, एकीकडे देशात उत्साहाचे वातावरण आहे. तसेच काही समाजकंटक आणि दहशतवादी संघटना या निर्णयाने दुखाविल्याने त्यानी घातपाताचा कट आखल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. यामुळे संपूर्ण देशांसह प्रत्येक राज्यातील राज्य पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी शहरातील अनेक ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे. गर्दीची रेल्वे स्थानके, गेट वे ऑफ इंडीया, जुहू चौपाटी, मारिन लाईन्स, मंत्रालय, सिद्धीविनायक मंदीर, स्वामी नारायण मंदिर, गिरगाव चौपाटी, सीएसएमटी रेल्वे स्थानक, चर्चगेट स्थानक, दादर स्थानकांवर मुंबई पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अनेक राजकीय पक्षांची कार्यालये त्याचप्रमाणे, शहरातील संवेदनशील भागात देखील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे, शाळा-महाविद्यालयाची देखील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. कारण शाळकरी विद्यार्थ्यांना टार्गेट करण्याचा कट या दहशतवादी संघटनांनी आखल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. तसेच मुबंईत येणाऱ्या वाहनांची देखील कसून तपासणी सुरु आहे. ठिकठिकाणी वाहतुक पोलिसांनी नाकाबंदी लावली आहे. गेस्ट हाऊस, हॉटेल, लॉजमध्ये देखील येणाऱ्या - जाणाऱ्यांची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. त्याचप्रमाणे साध्या वेशात पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली असून  दुसरीकडे राज्य एटीएसने काही संशयीतांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक पोलिसांनी परिसरातील गस्त वाढविली असून संशयित व्यक्ती आढळल्यास त्यांची चौकशी करण्यास सुरुवात आहे. त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त प्रणव अशोक यांनी नागरिकांना सतर्क राहून काही संशयित वस्तू अथवा गैरप्रकार आढळून आल्यास त्याबाबत पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे. 

नौदल आणि तटरक्षक दलाला सतर्कतेचे आदेश दरम्यान, मुंबई शहरावर दोन वेळा सागरी मार्गाने हल्ला झाला असून यावेळी देखील दहशतवादी संघटना हा मार्ग अवलंबवु शकतात. यामुळे नौदल आणि तटरक्षक दलाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तर नौदलाने गस्ती नौकासह भरसमुद्रात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. यावेळी नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर देखील दिमतीला असल्याचे नौदल अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईAnti Terrorist Squadएटीएसtraffic policeवाहतूक पोलीस