मुंबई: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला एक वर्षानंतर अटक

By धीरज परब | Updated: September 6, 2022 21:35 IST2022-09-06T21:35:22+5:302022-09-06T21:35:45+5:30

गाडीला कट मारली म्हणून १८ वर्षीय तरुणाची केली होती हत्या

Mumbai Murder accused arrested after one year | मुंबई: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला एक वर्षानंतर अटक

मुंबई: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला एक वर्षानंतर अटक

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: गाडीला कट मारली म्हणून एका १८ वर्षीय तरुणाची लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या केल्या प्रकरणातील आरोपीला वर्षभरानंतर अटक करण्यात काशीमीरा पोलिसांना यश मिळाले आहे. ३० ऑगस्ट २०२१ रोजी मीरारोडच्या हटकेश परिसरात फॉर्च्युन हाईट्स इमारती समोर शुभम भुवड (१८) रा. सिल्व्हर सरिता या तरुणाची ९ जणांनी कारला कट मारल्याच्या संशया वरून लाथाबुक्यांनी बेदम मारून हत्या केली होती . ह्या घटनेने त्यावेळी खळबळ उडून आरोपीं विरुद्ध संताप व्यक्त होत होता.

पोलिसांनी या घटनेनंतर विनोद उपाध्याय (४४), आकाश हिरवे (२५), कुणाल किणी (३३), अमृत उर्फ सनी उपाध्याय (२५), वसीम शेख (३१), मोहमद राजू इर्षाद शेख (३२), जतीन उपाध्याय (२०) आणि सायस मुंढे (२०) ह्या  ८ आरोपीना अटक केली होती . तर रवीप्रकाश कुनुमुल उर्फ रवी पुजारी ( ३२ ) रा. वाकीपाडा, नायगाव हा आरोपी पसार झाला होता. गेल्या वर्ष भरा पासून काशीमीराची  गुन्हे शाखा १ व काशीमीरा पोलीस पुजारी याच्या मागावर होते . गुन्हे शाखेचे निरीक्षक अविराज कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकास पुजारी हा आंध्रप्रदेशच्या आलीदाबाद येथील वागापूर मंडर भागात असल्याची माहिती मिळाली . ३ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेने त्याला पकडून ४ सप्टेंबर रोजी काशीमीरा पोलिसांच्या स्वाधीन केले . पुजारी ह्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता ७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

Web Title: Mumbai Murder accused arrested after one year