फसवणूक प्रकरणी मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक

By पूनम अपराज | Published: January 5, 2021 01:57 PM2021-01-05T13:57:00+5:302021-01-05T13:57:58+5:30

Fraud : याप्रकरणी कारवाई करत घाटकोपर पोलिसांनी तळेकर यांना अटक करण्यात आली.

Mumbai Dabbewala Association president Subhash Talekar arrested in fraud case | फसवणूक प्रकरणी मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक

फसवणूक प्रकरणी मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देअशा प्रकारे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डब्बेवाल्यांनी एकत्र येऊन तळेकर आणि आणखी चारजणांविरोधात भा. दं. वि. कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला होता.

मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. डब्बेवाल्यांना मोफत दुचाकी देण्याच्या नावाखाली फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कारवाई करत घाटकोपर पोलिसांनी तळेकर यांना अटक करण्यात आली.

 

गेल्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2020 मध्ये घाटकोपर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईच्या डब्बेवाल्यांनीच हा गुन्हा दाखल केला होता. तळेकर मुंबई डब्बेवाला संघटनेचे पदाधिकारी असताना त्यांनी दुचाकी मोफत देण्याच्या नावाखाली डब्बेवाल्यांची काही कागदपत्र घेतली होती. पण, त्यानंतर डब्बेवाल्यांना दुचाकी उत्पादक, विक्रेत्या कंपन्यांकडून कर्जाबाबत फोन येऊ लागले. तसेच कर्ज वसुलीसाठी त्यांना पतपेढ्यांकडूनही फोन येऊ लागले. डब्बेवाल्यांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावे कर्ज काढण्यात आल्याने त्यांना हे कॉल येऊ लागले होते. काहींनी कर्जाचे हप्तेही भरले. अशा प्रकारे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डब्बेवाल्यांनी एकत्र येऊन तळेकर आणि आणखी चारजणांविरोधात भा. दं. वि. कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला होता.

 

Read in English

Web Title: Mumbai Dabbewala Association president Subhash Talekar arrested in fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.