शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा सायबर विभाग रामभरोसे; पूर्णवेळ उपायुक्तही नाही, गुन्हे तीन हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 07:32 IST

उकल मात्र ४७७ गुन्ह्यांची, ६७५ आरोपींना अटक

-मनीषा म्हात्रेमुंबई : मुंबईत गेल्या नऊ महिन्यांत सायबर गुन्हेगारी संबंधित ३ हजार १९१ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी अवघ्या ४७७ गुन्ह्यांची उकल करत ६७५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणांसमोर कायम असताना मुंबईत गेल्या सहा महिन्यांपासून सायबर विभागाला पूर्ण वेळ पोलिस उपायुक्तही लाभलेले नाहीत. सायबर विभागाचा अतिरिक्त पदभार अंमलबजावणी विभागाच्या उपायुक्तांना देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरपर्यंत ३ हजार १९१ सायबर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये शेकडो कोटींवर सायबर ठगांनी डल्ला मारला आहे. 

तपास भत्ता मिळेना

एखाद्याच्या गुन्ह्याचा तपासासाठी तपास भत्ता, तसेच अद्ययावत यंत्रणाचा अभाव असल्यामुळे तपासावर परिणाम होत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच बऱ्याच जणांना जबरदस्तीने या विभागात ढकलले जाते. त्यामुळे आवड नसल्याने त्याचा कामावरही परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सायबर पोलिस ठाण्यात प्रशिक्षित व्यक्तींनाच ठेवणे गरजेचे आहे. ज्यांना आवड आहे अशा व्यक्तींची निवड केल्यास अपुऱ्या मनुष्यबळावरही गुन्ह्याची उकल होण्यास मदत होईल असेही त्यांनी नमूद केले आहे.

क्रेडिट कार्ड, ऑनलाइन फ्रॉड संबंधित ८८७ गुन्हे, नोकऱ्यांविषयक फसवणुकीच्या ३१९ गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे. सायबर गुन्हेगारांवर नियंत्रण आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. अपुरे मनुष्यबळ, तांत्रिक सुविधांच्या अभावामुळे महत्त्वाच्या अशा सायबर विभागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सायबर विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. बालसिंग राजपूत यांची मे महिन्यात सायबर विभागातून डिटेक्शनला बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. सध्या या विभागाचा अतिरिक्त कार्यभार अंमलबजावणी विभागाचे डॉ. डी. ए. स्वामी यांच्याकडे देण्यात आला. स्वामी यांच्याकडे सी. ए. डब्ल्यू. विभागाचाही अतिरिक्त भार आहे.  त्यामुळे सायबर विभागाला पूर्णवेळ उपयुक्त कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अन् पेनही आला नाही... 

सायबर गुन्ह्याच्या वाढत्या आव्हानामुळे मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र सायबर सेल सुरू करण्यात आले आहे. १० लाखांच्या व्यवहारांपर्यंतची प्रकरणे स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद होत आहेत. तर, १० लाखांवरील प्रकरणे सायबर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येत आहे. आजही ९० टक्के पोलिस ठाण्यात सायबर संबंधित आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. महिन्याला सायबर प्रशिक्षण होते. मात्र त्याचबरोबर आवश्यक टूल्स मिळणे गरजेचे आहे. आतापर्यंत तीन वेळा संदेश प्रसारणाद्वारे माहिती मागवण्यात आली. मात्र, साधा पेनही आला नसल्याचे सायबर सेलमध्ये काम करणाऱ्या पोलिसाने सांगितले. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमMumbai policeमुंबई पोलीस