१७ ऑगस्टला मूक मोर्चा... ATS च्या कारवाईचा सोपारा गावात होणार निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 17:57 IST2018-08-13T17:56:08+5:302018-08-13T17:57:05+5:30

भांडार अळी ते सिविक सेंटरपर्यंत (पंचमुख मंदिर)  हा मूकमोर्चा १७ ऑगस्ट रोजी काढणार

Mumba Morcha on August 17 ... protest against the ATS operation in village | १७ ऑगस्टला मूक मोर्चा... ATS च्या कारवाईचा सोपारा गावात होणार निषेध

१७ ऑगस्टला मूक मोर्चा... ATS च्या कारवाईचा सोपारा गावात होणार निषेध

नालासोपारा - शुक्रवारी कारवाई करत दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपाऱ्यात सोपारा गावातील भांडार अळी येथून वैभव राऊत आणि शरद कळसकर या दोघांना अटक केली. मात्र, या दोघांच्याही घरातील नातेवाईकांना अथवा गावातील एकही गावकऱ्याला विश्वासात न घेता एटीएसने कारवाई केली. तसेच एटीएसने केलेली कारवाई अयोग्य असून त्याविरोधात गावकरी रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढणार असल्याची माहिती  हर्षद राऊत यांनी दिली. या मूक मोर्चाबाबत आज रात्री अंतिम निर्णय घेणार असून भांडार अळी ते सिविक सेंटरपर्यंत (पंचमुख मंदिर)  हा मूकमोर्चा १७ ऑगस्ट रोजी काढणार असल्याचे पुढे राऊत यांनी सांगितले. सध्या भांडार अळी गावात एकूण १ हजार गावकरी आहेत. 

Web Title: Mumba Morcha on August 17 ... protest against the ATS operation in village