शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीतील अर्धवट जळालेल्या मृतदेहा संबंधित खुनाचा गुन्हा उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 13:27 IST

ताम्हिणी गावाजवळील मुगांव खिंड येथे एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह २६ फेब्रुवारी रोजी आढळून आला होता़...

ठळक मुद्देछेडछाडीवरुन नऱ्हेतील तरुणाचा खुन; एकाला अटक 

पुणे : मुळशी तालुक्यातील ताम्हिणी गावाजवळ मुगाव खिंड येथे पेट्रोल टाकून अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळालेल्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात १५ दिवसांनंतर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे़. याप्रकरणी ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे़. श्रीधर सत्यप्पा गाडेकर (रा़.नऱ्हे ) असे खुन झालेल्याचे नाव आहे़. मल्लिकार्जुन सोमलिंग बिराजदार (वय ३८, रा़ उजवी भुसारी कॉलनी, पौड) याला अटक करण्यात आली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ताम्हिणी गावाजवळील मुगांव खिंड येथे एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह २६ फेब्रुवारी रोजी आढळून आला होता़. याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे  व त्यांच्या सहकाऱ्यांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या बेपत्तामधील व्यक्तीशी मिळते जुळते असल्याचे आढळून आले़. त्यावरुन हा मृतदेह श्रीधर गाडेकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले़. गाडेकर हा महिलांची छेडछाड करीत असल्यामुळे मल्लिकार्जुन बिराजदार याने २५ फेब्रुवारीला मोटारीतून गाडेकर याला मुगाव खिंडीत नेले़. गाडीत मारहाण करुन त्यांना बेशुद्ध केले़.  तेथे त्यांच्या डोक्यात दगड घालून खुन केला़. त्यानंतर गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिले होते़.  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बिराजदार याला अधिक तपासासाठी पौड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे़.

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस