Mukesh Ambani bomb scare: Whose call came on Mansukh Hiran's mobile ?; Mumbai Police explanation | Mukesh Ambani bomb scare: मनसुख हिरेन यांच्या मोबाईलवर आलेला तो कॉल नेमका कुणाचा?; मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण

Mukesh Ambani bomb scare: मनसुख हिरेन यांच्या मोबाईलवर आलेला तो कॉल नेमका कुणाचा?; मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण

ठळक मुद्देकांदिवली गुन्हे शाखेतून तावडे नावाच्या अधिकाऱ्याने मनसुख यांना फोन केला होताया अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेलेले मनसुख हिरण हे पुन्हा घरी परतलेच नाहीत असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलेमनसुख यांच्या मोबाईलवर आलेला तो कॉल नेमका कुणाचा?

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी सापडलेल्या स्कोर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन(Mansukh Hiren) यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे, मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ त्यांचा मृतदेह आढळला, प्रथमदर्शनी हिरेन यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला, परंतु माझे पती आत्महत्या करणार नाहीत असा दावा मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केला होता.(Mumbai Police Clarification on Mansukh Hiren’s wife allegation)  

मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरण यांनी सांगितल्याप्रमाणे कांदिवली गुन्हे शाखेतून तावडे नावाच्या अधिकाऱ्याने मनसुख यांना फोन केला होता, त्यांनी ठाणे घोडबंदर येथे भेटण्यासाठी बोलावले होते, या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेलेले मनसुख हिरण हे पुन्हा घरी परतलेच नाहीत असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले, परंतु या प्रकरणात कांदिवली येथे तावडे नावाचा कोणी अधिकारीच नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांच्या वतीने देण्यात आलं आहे.  

तावडे नावाचा अधिकारी नाही...

याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवलीच्या गुन्हे शाखेत तावडे नावाचा कोणताही अधिकारी नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तो अधिकारी कोण? तो अधिकारीच होता का? की आणखीन कोणी? मनसुख यांच्या मोबाईलवर आलेला तो कॉल नेमका कुणाचा? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

“तपास अधिकारी अन् स्कोर्पिओ गाडी मालकाचं फोनवरून संभाषण”; मुकेश अंबानी प्रकरणाला वेगळंच वळण

मृत्यूची सखोल चौकशी व्हावी

माझे पती आत्महत्या करूच शकत नाही, ते पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत होते, गेल्या ८ दिवसांपासून त्यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावलं, काल सुद्धा पोलिसांनी हिरण यांना बोलावलं. कांदिवली क्राईम ब्रँचचे तावडे नावाच्या पोलिसाचा फोन आला. त्या पोलिसाने घोडबंदर येथे भेटायला बोलावले. मनसुख तिकडे गेले त्यानंतर रात्री १० वाजल्यानंतर मनसुख हिरेन यांचा फोन बंद झाला. मात्र आज बातमी कळली की, त्यांचा मृतदेह मुंब्रा येथे सापडला. पोलिसांकड़ून जेव्हा जेव्हा त्यांना बोलावले तेव्हा त्यांच्याकड़ून सहकार्य करण्यात येत होते. त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त चुकीचे आहे. कारण ते कधीच तणावात नव्हते. आयुष्यात असाही दिवस येईल असं स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पत्नी विमल हिरण यांनी केली आहे.

अत्यंत गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक हे प्रकरण

मनसुख हिरण यांचा मृतदेह सापडल्याने हे प्रकरण विधिमंडळातही गाजलं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणावरून तपास अधिकारी सचिन वाझेंबद्दल शंका उपस्थित केली, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून गृहमंत्री अनिल देशमुख(Home Minister Anil Deshmukh) या प्रकरणावर भाष्य का करत नाहीत, हे प्रकरण NIA कडे सोपवण्यात यावं. (Devendra Fadnavis Demands Handling over Probe into Car Found Near Mukesh Ambani's House to NIA) तसेच यापुढे जात देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे की, जून आणि जुलै २०२० मध्ये याच गाडी मालकासोबत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं संभाषण झाल्याचा सीडीआर आहे, गाडी मालक आणि सचिन वाझे हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते का? असा प्रश्न उपस्थित त्यांनी विचारला. 

“मनसुख हिरण आत्महत्या करणार नाहीत, ते चांगले स्विमर”; मुलाचा धक्कादायक दावा

अर्णबला अटक केली त्याचा राग का?

अर्णब गोस्वामींना अटक केली त्याचा सचिन वाझेंवर राग आहे का? सचिन वाझेंनी ७ दिवस अन्वय नाईक केसमध्ये त्यांना आत टाकलं होतं, मनसुख हिरेन प्रकरणात जी काही माहिती असेल महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस तपास करण्यास सक्षम आहेत. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुब्रा रेती बंदर येथे सापडली, त्यांच्या अंगावर कोणतंही चिन्ह नाही, ठाणे पोलीस अधिक तपास करत आहेत असं सांगत गृहमंत्री अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला उत्तर दिलं आहे. 

Web Title: Mukesh Ambani bomb scare: Whose call came on Mansukh Hiran's mobile ?; Mumbai Police explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.