सासरी गेलेल्या एमएसईबी कर्मचाऱ्याला चोरट्यांचा शॉक; ३.१९ लाखांची घरफोडी
By योगेश पांडे | Updated: November 28, 2023 16:03 IST2023-11-28T16:02:48+5:302023-11-28T16:03:52+5:30
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

सासरी गेलेल्या एमएसईबी कर्मचाऱ्याला चोरट्यांचा शॉक; ३.१९ लाखांची घरफोडी
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: सासुरवाडीला गेलेल्या एका एमएसईबी कर्मचाऱ्यांना अज्ञात चोरट्यांनी मोठा शॉक दिला. घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी ३.१९ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
ओमप्रकाश महीपाल ठाकूर (३८,लोकविहार पार्क, भिलगाव) हे एमएसईबीमध्ये कार्यरत आहेत. २५ नोव्हेंबर रोजी ते पत्नी व दोन मुलांसह म्हसाळा येथे सासुरवाडीत गेले. ते दोन दिवस तेथेच थांबले व २७ नोव्हेंबर रोजी ते सकाळी घरी परतले. त्यावेळी त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले होते. चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटातून मंगळसूत्रासह सोन्याचांदीचे दागिने व रोख १.३० लाख रुपये लंपास केले. ठाकूर यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.