अमळनेरला आणखी एका गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई
By संजय पाटील | Updated: March 15, 2023 23:54 IST2023-03-15T23:53:48+5:302023-03-15T23:54:19+5:30
तीन महिन्यात तिसरी एमपीडीए कारवाई

अमळनेरला आणखी एका गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई
संजय पाटील, अमळनेर (जि.जळगाव): अमळनेर शहरात 'गुन्हेगार वॉश आऊट' मोहिमेत तीन महिन्यात तिसरी एमपीडीए कारवाई करण्यात आली. विशाल सोनवणे (२७) याला स्थानबद्ध करून त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दादू धोबी, शुभम देशमुख या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई केल्यानंतर तब्बल १३ गुन्हे दाखल असलेल्या विशाल सोनवणे याच्यावरही एमपीडीए कारवाई करण्यात आली.
मोटरसायकल चोरी, विनयभंग, जबरी चोरी, खंडणी मागणे, धारदार शस्र आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे , जातीयवादी गुन्हे करणे , दंगल माजवून गर्दी करून लोकांमध्ये दहशत घालणे , फायटर पिस्टल लावून जबरी चोरी ,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचे गुन्हे त्याच्याविरुध्द दाखल होते. विशाल याच्या दहशतीमुळे एका कुटुंबाने आत्महत्या करण्याचा विचार बोलून दाखवला होता. यामुळे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.