दोन जिगरी मित्र एकाच तरूणीच्या पडले प्रेमात, मग एका मित्राने केली दुसऱ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 12:42 IST2022-02-07T12:41:03+5:302022-02-07T12:42:18+5:30

MP Crime News : येथील रायपूर वस्तीत राहणारा ३० वर्षीय राकेश आदिवासीचा मृतदेह उत्तर प्रदेशच्या सीमेवर सापडला. त्याच्यावर गोळ्या झाडून रस्त्याच्या बाजूला फेकण्यात आलं होतं.

MP : Two friends affair with same woman, One friend killed other | दोन जिगरी मित्र एकाच तरूणीच्या पडले प्रेमात, मग एका मित्राने केली दुसऱ्याची हत्या

दोन जिगरी मित्र एकाच तरूणीच्या पडले प्रेमात, मग एका मित्राने केली दुसऱ्याची हत्या

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) रीवामध्ये उत्तर प्रदेशच्या सीमेवर प्रेम प्रकरणातून एका तरूणाची गोळी झाडून हत्या (Murder) करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी केली तर आश्चर्यजनक खुलासा झाला. पोलिसांनी सांगितलं की, तरूणाला त्याच्याच खास मित्राने गोळी झाडून मारलं.

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना रीवा जिल्ह्यातील चाकघाटातील आहे. येथील रायपूर वस्तीत राहणारा ३० वर्षीय राकेश आदिवासीचा मृतदेह उत्तर प्रदेशच्या सीमेवर सापडला. त्याच्यावर गोळ्या झाडून रस्त्याच्या बाजूला फेकण्यात आलं होतं. सूचनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि फॉरेन्सिक एक्सपर्टकडून तपास केला. तेव्हा पोलिसांच्या हाती काही पुरावे सापडले.

पोलिसांनी खुलासा केला की एका महिलेसोबत मृत राकेशचे प्रेम संबंध होते. राकेशचा मित्र अशोक मांझी सुद्धा या महिलेच्या प्रेमात होता. म्हणजे दोन खास मित्र एकाच महिलेवर प्रेम करत होते. अशात आपल्या मित्राला रस्त्यातून हटवण्यासाठी प्लान केला. त्यानंतर अशोकने गोळी झाडून राकेशची हत्या केली.

पोलिसांनी आरोपी अशोक मांझीला अटक केली आहे. पोलीस यात महिलेच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. एसएसपी रीवा शिव कुमार वर्मा म्हणाले की, आरोपीने हत्येबाबत आधी प्रेयसी राहिलेल्या या महिलेला सांगितली होती. हत्या केल्यावर त्याने प्रेयसीला फोनवरून याची माहिती दिली होती.
 

Web Title: MP : Two friends affair with same woman, One friend killed other