शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नववधूला शेजारीण म्हणाली काळी अन् दोन कुटुंबात फ्री स्टाईलच झाली; बायकांची दे दणादण हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 13:37 IST

मध्य प्रदेशातील कछपुरा गावातील ही घटना आहे. नव्या नवरीचा चेहरा दाखवण्याचा कार्यक्रमात झालेल्या हाणामारीवरून पोलिसात चक्क दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत.

लग्न म्हटलं की, देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे रितीरिवाज असतात. यातील एक रिवाज म्हणजे नवरीचा चेहऱ्या बघण्याचा. यात काही महिलांना बोलवून हा विशेष कार्यक्रम केला जातो. मात्र, एके ठिकाणी याच नवरीचा चेहरा बघण्याच्या कार्यक्रमात महिलांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. हा वाद इतका पेटला की, थेट पोलिसात हे प्रकरण गेलं.

मध्य प्रदेशातील कछपुरा गावातील ही घटना आहे. नव्या नवरीचा चेहरा दाखवण्याचा कार्यक्रमात झालेल्या हाणामारीवरून पोलिसात चक्क दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. नवरीचा चेहरा दाखवण्यासाठी शेजारील महिलांना बोलावण्यात आलं होतं. त्यातील एक महिला म्हणाली की, नवरी काळी आहे. त्यावर दुसऱ्या एका महिलेनं चिडून गोऱ्या मुली तर पळून जातात, असं म्हटलं. अशात शेजारीच उभी असलेली गोऱ्या वर्णाची मुलगी संतापली आणि महिलांमध्ये यावरून वाद पेटला. (हे पण वाचा : मुलाचा गुन्हा, आईला शिक्षा! पळून गेलेल्या तरूणीच्या कुटुंबीयांनी तिच्या बॉयफ्रेन्डच्या आईचं केलं अपहरण.....)

महिला आणि एका मुलीच्या कुटुंबीयांमध्ये यावेळी चांगलीच बाचाबाची झाली आणि त्याचे हाणामारीत रूपांतर झालं. संबंधित महिलेनं त्या मुलीच्या पोटावर चावा घेतला आणि तिचे केसही ओढले. मारामारीच्या प्रकारानंतर दोन्ही बाजूंनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. (हे पण वाचा : बहिणीच्या सासरी गेला होता भाऊ, तिथे असं काही घडलं की चक्क बहीण-भावाचं लग्न लावून देण्यात आलं!)

नवरीचा चेहरा दाखवण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला सर्व काही ठीक सुरू होतं. अशात गावातील एका रेखा नावाच्या महिलेनं शेजारी उभा राहिलेल्या १७ वर्षीय किशोरी नावाच्या तरुणीकडं पाहत, गोऱ्या रंगाच्या मुली तर पळून जातात असा टोमणा मारला. ही महिला इतक्यावर थांबली नाही तर गोऱ्या रंगाच्या मुलींचे अनेक मुलांसोबत चक्कर चालू असतात, त्या कधी त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत पळून जातात, असंही ती म्हटलं.

हे ऐकून ती मुलगी चांगलीच संतापली. घडलेल्या प्रकारानंतर चिडून मुलगी तिच्या घरी निघून गेली आणि तिने घडलेला सर्व प्रकार आईला आणि कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर हा वाद आणखी पेटला. या प्रकारावरून संतापलेल्या टोमणा मारणाऱ्या महिलेने किशोरीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीमध्ये महिलेने किशोरीच्या पोटाला चावा घेतला आणि त्यानंतर दोघी बहिणींनी मिळून त्याला महिलेलाही बेदम मारहाण केली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके