Shocking! वडिलांनी खर्च केले १५०० रूपये, नाराज मुलाने केलं हे धक्कादायक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 12:42 IST2021-08-20T12:41:21+5:302021-08-20T12:42:42+5:30

चौकशीदरम्यान पोलिसांना आरोपीने सांगितलं की, त्याने आपल्या वडिलांना १५०० रूपये  सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते.

MP : Son killed father over 1500 rupees police arrested in Gwalior | Shocking! वडिलांनी खर्च केले १५०० रूपये, नाराज मुलाने केलं हे धक्कादायक कृत्य

Shocking! वडिलांनी खर्च केले १५०० रूपये, नाराज मुलाने केलं हे धक्कादायक कृत्य

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यावर लोखंडी सळीने वार करत त्यांची हत्या केली. असं सांगितलं जात आहे की, गंभीरपणे जखमी झाल्यावर वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हत्येची ही घटना शहरातील थाटीपूर खलीफा कॉलनीमध्ये बुधवारी घडली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी मुलाला अटक केली आहे.

चौकशीदरम्यान पोलिसांना आरोपीने सांगितलं की, त्याने आपल्या वडिलांना १५०० रूपये  सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते. जेव्हा त्याने आपल्या वडिलांना या पैशाबाबत विचारले तर त्यांनी ते खर्च झाल्याचं सांगितलं. यावरून वडील आणि मुलात वाद सुरू झाला होता. त्यानंतर रागात मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यावर लोखंडी सळीने वार केला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. (हे पण वाचा : रात्री प्रेयसीला भेटायला आला होता सब-इन्स्पेक्टर, गावकऱ्यांनी खांबाला बांधून बेदम मारलं!)

शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर थाटीपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरूनच पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली. मृत कमलेशला दोन आणखी मुलं आहेत. 
 

Web Title: MP : Son killed father over 1500 rupees police arrested in Gwalior