मालिशच्या बहाण्याने शेजारच्या महिलेवर रेप, हात-पाय बांधून तोंडात कोंबला कपडा आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 14:50 IST2022-09-12T14:48:23+5:302022-09-12T14:50:59+5:30
Crime News : आरोपी चंदन गौडने हत्येनंतर मृतदेह एक दिवस घरातच ठेवला होता. तो व्यवसायाने हलवाई आहे आणि मालिशचं कामही करतो.

मालिशच्या बहाण्याने शेजारच्या महिलेवर रेप, हात-पाय बांधून तोंडात कोंबला कपडा आणि मग...
Crime News : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमधून (Gwalior) एका महिलेसोबत रेप आणि हत्येची (Rape and Murder) खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा खुलासा करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी चंदन गौडने हत्येनंतर मृतदेह एक दिवस घरातच ठेवला होता. तो व्यवसायाने हलवाई आहे आणि मालिशचं कामही करतो.
पोलिसांनी सांगितलं की, परिसरातच राहत असल्याने मृत महिला आरोपी चंदन गौडला ओळखत होती. यामुळे ती त्याच्याकडे कंबरेची मालिश करण्यासाठी गेली होती. यादरम्यान चंदनचं मन बदललं आणि त्याने महिलेवर रेप करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केला तेव्हा त्याने तिच्यावर काठीने वार केला आणि हात-पाय बांधून तिच्या तोंडात कपडा कोंबला.
यानंतर महिला बेशुद्ध असताना त्याने तिच्यासोबत रेप केला. महिलेच्या डोक्यावर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. आरोपी महिलेचा मृतदेह घरातच ठेवून माल विकण्यासाठी बाहेर गेला. रात्री घरी परत आल्यावर त्याने जेवण तयार केलं आणि जेवण केलं.
त्यानंतर मृतदेह बाहेर फेकला. पोलिसांना भरकटवण्यासाठी त्याने तो त्यावेळी तिथेच उपस्थित असल्याचं सांगितलं. त्यानंतर परिसरात पोलिसांनी केलेली चौकशी पाहून तो घाबरला. त्यानंतर तो बडा गावात गेला आणि नशेत असताना एका गाडीला भिडला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
याप्रकरणी एसपी ग्वाल्हेर अमित सांघी यांनी सांगितलं की, 'दोन दिवस हॉस्पिटलमध्ये भरती असूनही आरोपी पायी चालत त्याच्या सासर दतियाला पोहोचला. इथे पोलिसांना परिसरात सर्वांची चौकशी केल्यावर एक दरवाजा बंद दिसला. त्या घरात राहणारा व्यक्तीही गायब होता. यानंतर पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी प्लानिंग करून त्याला पकडलं. चौकशी केल्यावर त्याने हत्या आणि रेप केल्याचं मान्य केलं'.