नवरदेवाला लावली जात होती हळद, गर्लफ्रेन्डच्या हत्येप्रकरणी उचलून घेऊन गेले पोलीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 09:26 AM2021-05-08T09:26:36+5:302021-05-08T09:35:23+5:30

कॅंट पोलीस स्टेशन क्षेत्रातील कोल्हूपुरामध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाइल केली आणि घरात हळद लावत असलेल्या नवरदेवाला उचलून घेऊन गेले.

MP : Police arrested Groom for girlfriend murder while his haldi ceremony | नवरदेवाला लावली जात होती हळद, गर्लफ्रेन्डच्या हत्येप्रकरणी उचलून घेऊन गेले पोलीस!

नवरदेवाला लावली जात होती हळद, गर्लफ्रेन्डच्या हत्येप्रकरणी उचलून घेऊन गेले पोलीस!

Next

(Image Credit : Aajtak)

अनेक सिनेमात आपण पाहिले असेल की, लग्न सुरू असतं आणि ऐनवेळी पोलीस येऊन एखाद्या गुन्ह्यात नवरदेवाला उचलून घेऊन जातात. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Crime News) गुनामधून(Guna) अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. कॅंट पोलीस स्टेशन क्षेत्रातील कोल्हूपुरामध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाइल केली आणि घरात हळद लावत असलेल्या नवरदेवाला उचलून घेऊन गेले. नवरदेव बनलेल्या संजय कोरीला अटक झाल्यावर जो खुलासा झाला त्याने सर्वांनाच धक्का बसला.

Aajtak ने दिलेल्या वृत्तानुसार, शिवपुरी जिल्ह्यातील बदरवासमध्ये ब्युटी पार्लर चालवणारी महिला लक्ष्मी तोमरचा मृतदेह ३० एप्रिलला बेवारस स्थितीत आढळून आला होता. कोरोना कर्फ्यू दरम्यान महिलेचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसही हैराण झाले होते. त्यात महिलेजवळ पोलिसांना असा कोणताही पुरावा मिळाला नाही ज्याने ते पुढे तपास करू शकतील. (हे पण वाचा : काकाने केली पुतण्याची हत्या; शेतीवरून झालेला वाद जीवावर बेतला )

 

पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियावर महिलेच्या मृतदेहाचा फोटो शेअऱ केला होता. तेव्हा ५ मे रोजी पोलिसांना माहिती मिळाली की, महिला ब्युटी पार्लर चालवत होती आणि तिचं नाव लक्ष्मी तोमर आहे. नंतर एक एक धागा जोडत पोलिसांनी शेवटी संजय कोरीला अटक केली.  आरोपीने पोलिसांसमोर कबूल केलं की, त्याचे आणि महिलेचे अनैतिक संबंध होते. आरोपीने सांगितले की,  महिला त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. महिलेचा आधीच घटस्फोट झाला होता. (हे पण वाचा : दे धक्का! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पत्नीने पतीला मागितले २० लाख रूपये, कॉल करून म्हणाली - '...तर तुझा जीव घेईन!')

आरोपीने पोलिसांना सांगितले की, महिला लक्ष्मी तोमर बदरवासमध्ये ब्युटी पार्लर चालवत होती. ती नेहमी खरेदीसाठी गुना येथे जात होती. गुनात महिलेची भेट संजयसोबत झाली. दोघांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. महिलेचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे तिने संजयसोबत लग्न करण्याचा विचार केला होता. मात्र, संजय यावरून नाराज होता. संजयला घरातील लोकांच्या मर्जीनुसार लग्न करायचं होतं. नंतर संजयने महिलेला दूर करण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य  झालं नाही.

नंतर संजयने महिलेच्या हत्येचा कट रचला. बदरवासला पोहोचल्यावर संजयने महिलेला गुना येथे येण्यास तयार केलं. संजयने तिला सांगितले की, लग्न करूया. संजयच्या बोलण्यात ती फसली आणि त्याच्यासोबत गेली. मात्र, रस्त्याच्या मधेच ३० एप्रिलला संजयने महिलेचा गळा चिरून तिची हत्या केली. नंतर तिचा मृतदेह झाडांमध्ये फेकून दिला.

८ मे रोजी संजयचं लग्न होणार होतं. त्याआधीच हळदीला पोलिसांनी संजयला अटक केली. हळदीचा कार्यक्रम सुरू असताना पोलिसांना त्याला उचललं. संजयच्या मोबाइलमध्ये दोघांच्या अनैतिक संबंधाचे अनेक रहस्य होते. तो मोबाइल त्याने नाल्यात फेकला होता. नंतर हा मोबाइल शोधण्यात आला.  त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 
 

Web Title: MP : Police arrested Groom for girlfriend murder while his haldi ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.