बाबो! रिक्षावाल्या प्रियकरासोबत ४५ वर्षीय महिला फरार, सोबत घेऊन गेली तिजोरीतील ४७ लाख रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 05:47 PM2021-10-22T17:47:02+5:302021-10-22T17:47:21+5:30

MP Crime News : हाजी कॉलनीतील एका श्रीमंत परिवारातील महिला बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. महिला तिच्या घरातून गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता आहे.

MP : Indore women run away with lover takes 47 lakh rupees with her | बाबो! रिक्षावाल्या प्रियकरासोबत ४५ वर्षीय महिला फरार, सोबत घेऊन गेली तिजोरीतील ४७ लाख रूपये

बाबो! रिक्षावाल्या प्रियकरासोबत ४५ वर्षीय महिला फरार, सोबत घेऊन गेली तिजोरीतील ४७ लाख रूपये

Next

मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये एका श्रीमंत परिवारातील ४५ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चौकशी केली गेली तर महिला तिच्यापेक्षा वयाने १३ वर्षाने लहान ३२ वर्षीय रिक्षा चालक प्रियकरासोबत फरार झाल्याचं उघड झालं. इतकंच नाही तर महिला घरातील तिजोरीतून ४७ लाख रूपये आणि दागिन्यांनी भरलेली बॅग आपल्यासोबत घेऊन गेली. परिवाराने पोलिसात महिलेविरोधात तक्रार दाखल केली.

हाजी कॉलनीतील एका श्रीमंत परिवारातील महिला बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. महिला तिच्या घरातून गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता आहे. खजरना पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली. महिलेचं सासर आणि माहेर दोन्ही पक्ष श्रीमंत आहे. ते कोट्यावधी रूपयांच्या जमिनीचे मालक आहेत. 

पतीने पोलिसांना सांगितलं की, पत्नी काहीच न सांगता घरातून गेली, मोबाइल बंद होता त्यामुळे संशय वाढला आणि मग तिच्याबाबत माहिती गोळा केली. तेव्हा समोर आलं की, तिचं रिक्षा चालकासोबत अफेअर सुरू होतं आणि तो सुद्धा तिच्यासोबत गायब आहे. पोलिसांनी एक टीम लोकेशननुसार जावरा येथे पाठवली आहे. सध्या दोघांचेही मोबाइल बंद येत आहेत.

कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच जमिनीच्या एका व्यवहारातून मिळालेले ४७ लाख रूपये तिजोरीत ठेवले होते. तिजोरीची चावी महिलेकडेच राहत होती. ती संधी बघत पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली.  सध्या पोलीस महिला आणि तिच्या प्रियकराच्या शोधात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत आहेत. महिला आणि प्रियकर पकडला गेल्यावरच पोलीस याबाबत खुलासा करू शकते.
 

Web Title: MP : Indore women run away with lover takes 47 lakh rupees with her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app