Gay मित्राला त्याच्या मित्रासोबत ठेवायचे होते संबंध, नकार दिला तर घेतला त्याचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 17:26 IST2021-12-30T17:23:33+5:302021-12-30T17:26:41+5:30

MP Crime News : मृतदेहाची ओळख पटल्यावर पोलिसांनी चौकशी आणि वेगाने केली. त्यांना एक-एक धागेदोरे मिळत गेले. अखेर त्यांनी हत्येप्रकरणी मृत तरूणाचा मित्र दिपक सोलंकी याला ताब्यात घेतलं.

MP : Gay friend wanted to have a relationship with a friend, get murdered after says no | Gay मित्राला त्याच्या मित्रासोबत ठेवायचे होते संबंध, नकार दिला तर घेतला त्याचा जीव

Gay मित्राला त्याच्या मित्रासोबत ठेवायचे होते संबंध, नकार दिला तर घेतला त्याचा जीव

(Image Credit : time.com)

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) बडवानीमधून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यावरून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या (Gay Man Killed Friend) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या धक्कादायक हत्येचा पर्दाफाश मध्य प्रदेश पोलिसांनी आपल्या चौकशी दरम्यान केली. आरोपीला पोलिसांनी अटक केलीये.

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्हयातील ही घटना आहे. २७ डिसेंबरला मेला ग्राउंडजवळ नाल्यात एका अज्ञात तरूणाचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर मृत तरूण हा यश सोनी असल्याचं समजलं.

मृतदेहाची ओळख पटल्यावर पोलिसांनी चौकशी आणि वेगाने केली. त्यांना एक-एक धागेदोरे मिळत गेले. अखेर त्यांनी हत्येप्रकरणी मृत तरूणाचा मित्र दिपक सोलंकी याला ताब्यात घेतलं.

एसपी दिपक शुक्ला यांनी याप्रकरणी सांगितलं की, मृत तरूण यश सोनी गे होता. तो दिपकसोबत संबंध ठेवण्यावरून त्याच्यावर दबाव टाकत होता. पण दिपकला त्याच्यासोबत संबंध ठेवायचे नव्हते. ज्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. याच वादातून दिपकने यश सोनीची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह मेला ग्राउंडजवळच्या नाल्यात फेकला होता. पोलिसांनी या केसचा छडा लावत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
 

Web Title: MP : Gay friend wanted to have a relationship with a friend, get murdered after says no