शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

पोलिसांनी कंडोमच्या मदतीने सॉल्व्ह केली रेप आणि मर्डर मिस्ट्री, आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 18:29 IST

कुणालाही या घटनेची खबर नव्हती आणि आरोपी मोठ्या आरामात फिरत होते. पण त्यांच्या एका चुकीने ते पोलिसांच्या तावडीत सापडले.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Gang  Rape) भिंडमध्ये पोलिसांनी कंडोमच्या (Condom) मदतीने रेप आणि मर्डरची एक केस सॉल्व्ह केली आहे. या केसमध्ये दूरदूरपर्यंत कोणताही पुरावा मिळत नव्हता. भिंडमध्ये आरोपींना एका महिलेसोबत रेप केला आणि हत्या करून तिचा मृतदेह एका पोत्यात बांधून खड्ड्यात (Rape and Murder Case) फेकून दिला. कुणालाही या घटनेची खबर नव्हती आणि आरोपी मोठ्या आरामात फिरत होते. पण त्यांच्या एका चुकीने ते पोलिसांच्या तावडीत सापडले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिसरातील कैमोखरी गावात १७ जून रोजी एका महिलेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला दिसून आला होता. पोत्याचं तोंड बांधलेलं होतं. तरी त्यातून दुर्गंधी येत होती. यातून हे स्पष्ट होत होतं की, मृत्यू काही दिवसांपूर्वी झालाय. गावातील लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांना घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. (हे पण वाचा : Shocking! सासूने ५ लाखांची सुपारी देऊन केली जावयाची हत्या, कारण वाचून चक्रावून जाल)

पोलिसांनी चौकशीच्या सुरूवातीलाच संशय व्यक्त केला की कुणीतरी महिलेची हत्या करून पुरावे मिटवण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात टाकला आणि खड्ड्यात फेकला. जेणेकरून कुणाला समजू नये. यात केसमध्ये पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण मृत महिलेची ओळखही पटली नाही. महिलेचं वय ४० च्या आसपास सांगितलं जात आहे.

घटनास्थळी सापडला कंडोम

घटनास्थळी पाहणी करताना पोलिसांना तिथे एक कंडोम सापडला. जो गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोठा पुरावा ठरला. पोलिसांनी आधी कंडोमच्या बॅच नंबरबाबत माहिती काढली. सोबतच महिलेची ओळख पटवण्यासाठी काही पॅम्पलेटही छापण्यात आले होते. यात महिलेच्या चेहऱ्याबाबत, कपड्यांबाबत आणि स्थितीबाबत माहिती देण्यात आली होती. (हे पण वाचा : माणुसकीला काळीमा! 12 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह)

असा सापडला पुरावा

ही मर्डर केस सॉल्व्ह करण्यादरम्यान कंडोमच्या बॅचवरून पोलिसांना माहिती मिळाली की, असे कंडोम मिहोनाच्या सरकारी हॉस्पिटलकडून कुटुंब नियोजनासाठी वाटले जातात. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली. इथेच त्यांच्या हाती मोठा पुरावा लागला. तसेच महिलेची ओळख पटवण्यासही यश आलं. मृत महिलेच्या परिवाराने सांगितलं की, महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. सोबतच त्यांना श्याम नावाच्या एका तरूणावर हत्येचा संशय आहे. पोलिसांनी श्यामला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तेव्हा त्याने पूर्ण घटनाक्रमच उलगडला.

तीन आरोपींना अटक

पोलिसांनी याप्रकरणी श्यामसोबतच अकिंत आणि विक्की नावाच्या आरोपींनाही अटक केली. हत्येत वापरण्यात आलेली बाइकही ताब्यात घेण्यात आली आहे. आरोपींनी महिलेचा मोबाइल फोन OLX वर विकला होता. आता पोलीस या गॅगरेप आणि मर्डर केसमध्ये सहभागी इतर आरोपींचा शोध आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ