MP ADG Purushottam Sharma beating his wife brutally; video went viral | आयपीएस पुरुषोत्तम शर्मांना प्रेयसीसोबत पकडले; पत्नीला घरी येऊन मारहाण

आयपीएस पुरुषोत्तम शर्मांना प्रेयसीसोबत पकडले; पत्नीला घरी येऊन मारहाण

भोपाळ : स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा पुन्हा एका मोठ्या वादात सापडले आहेत. आयपीएस पुरुषोत्तम शर्मा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते त्यांच्य़ा पत्नीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे शर्मा यांना प्रेय़सीसोबत त्यांच्या पत्नीने  रंगेहाथ पकडल्याने ही मारहाण केल्य़ाचे कबूल केले आहे. 


पत्नीने प्रेयसीसोबत पकडल्याने भडकलेल्या आयपीएस शर्मा यांनी घरी येत पत्नीवर हल्ला केला. तिचा गळा काखोटीत धरून तिला जमिनीवर पाडले आणि जोरदार हातबुक्के लगावले. शर्मा यांच्या घरात तैनात कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पत्नीला यातून सोडविले. यवर पुरुषोत्तम शर्मा यांच्या मुलाने त्यांची तक्रार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली असून वडिलांवर कारवाईची मागणी केली आहे. शर्मा यांच्या पत्नीने बचावासाठी त्यांच्यावर कात्रीने वार केले आहेत. 


या कृत्य़ाचा शर्मा यांच्या घरातील कोणीतरी व्हिडीओ काढला असून तो कमालीचा व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये आयपीएस शर्मा हे त्यांचया पत्नीला मारहाण करताना दिसत आहेत. तर पत्नीने बचावासाठी त्यांच्यावर घरातील कैची घेतली आहे. तसेच शर्मा पत्नीला शिव्यांची लाखोली वाहत आहेत. या व्हिडीओत घरातील दोन कर्मचारी ही हाणामारी सोडविण्याच्या प्रय़त्नात दिसत आहेत. 


शर्मा यांच्या मुलाने बापाच्या या कृत्याचा हा व्हिडीओ गृह मंत्री नरोत्तम मिश्रा, डीजीपी आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांना पाठविला आहे. मात्र, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्य़ांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाईही झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनाही हा व्हिडीओ पाठविण्यात आल्याने या अधिकाऱ्यावर काय कारवाई होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 


हनीट्रॅप प्रकरणातही शर्मा अडकलेले
वादात सापडण्याची पुरुषोत्तम शर्मा यांची ही काही पहिलीच वेळ नाही. एसटीएफचे डीजी असतानाही ते खूप चर्चेत असायचे. हनीट्रॅप कांडामध्येही त्यांचे नाव खूप चर्चेत होते. याशिवाय राज्याबाहेरही एसटीएफच्या एका फ्लॅटची चर्चा झाली होती. यावेळी राज्याचे दोन डीजीपी समोरासमोर आले आहे. यानंतर कमलनाथ सरकारने शर्मा यांची उचलबांगडी केली होती. 
पुरुषोत्तम शर्मा यांचा तक्रारदार मुलगापार्थ गौतम शर्मा हे आयआरएस अधिकारी आहेत. त्यानेच हा व्हिडीओ व्हारल केल्याचे सांगितले जात आहे. मोठा अधिकारी असल्याने पोलीस दलातही कोणी अवाक्षर काढत नाहीय. 

Web Title: MP ADG Purushottam Sharma beating his wife brutally; video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.