मोटारसायकल, रिक्षाचोर कर्जत पोलिसांच्या ताब्यात; गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 01:01 AM2021-03-23T01:01:06+5:302021-03-23T01:02:17+5:30

कल्याण, बदलापूर येथून चोरी केलेली पाच वाहने जप्त

Motorcycle, rickshaw puller in Karjat police custody; Performance of Crime Disclosure Squad | मोटारसायकल, रिक्षाचोर कर्जत पोलिसांच्या ताब्यात; गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

मोटारसायकल, रिक्षाचोर कर्जत पोलिसांच्या ताब्यात; गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

googlenewsNext

कर्जत : कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथून मोटारसायकल, रिक्षा चोरणारा चोर कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला आहे. त्याने ३ लाख ७० हजार किमतीची ५ वाहने चोरली होती.

कर्जत पोलीस ठाणे हद्दीमध्ये वाढत्या चोऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी २१ मार्च रोजी कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रगटीकरण पथक कर्जत शहरामध्ये पेट्रोलिंग करीत होते. किरवली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ पेट्रोलिंग करीत असताना पथकाला एक संशयित रिक्षा क्रमांक (एमएच-०५ डी क्यू ९६४४) नेरळ बाजूकडून कर्जतकडे येत असल्याचे दिसले. त्याला थांबवून त्याच्याकडे कागदपत्रांची व वाहन परवान्याची मागणी केली असता, कोणतीही कागदपत्रे त्याच्याकडे आढळून आली नाहीत. 

रिक्षा ही त्याच्या कर्जत येथील मित्राची असल्याबाबत सांगून तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, त्यावेळी पथकाने कार इन्फर्मेशन ॲपद्वारे रिक्षाची माहिती काढली असता, ती सुधीर मधुकर गांगुर्डे यांच्या नावे असल्याचे आढळून आले. ही रिक्षा चोरीची असल्याबाबत पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्या व्यक्तीचे नाव, गाव विचारले असता, त्याने कर्जत तालुक्यातील तमनाथ येथे राहत असून, माझे नाव संदेश शिवाजी बोराडे (वय १८) असे सांगितले. पोलिसांनी रिक्षा पोलीस ठाण्यात आणली. त्याच्याकडे चौकशी केली असता, ही रिक्षा काही दिवसांपूर्वी कल्याण इथून चोरी करून आणल्याचे त्याने कबूल केले. त्याबाबत पोलीस अंमलदार अश्रुबा बेंद्रे यांनी माहिती देऊन कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला. रिक्षाचालकाला अटक करून चौकशी केली असता, त्याने तीन महिन्यांपासून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथून वाहने चोरी केल्याचे कबूल केले.

रिक्षाचालकाला अटक करून अधिक चौकशी केली असता, त्याने मागील तीन महिन्यांपासून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथून २ बजाज कंपनीच्या रिक्षा, २ बुलेट मोटारसायकली, १ हिरोहोंडा पॅशन-प्रो मोटारसायकल अशी ३ लाख ७० हजार रुपये किमतीची एकूण ५ वाहने चोरी करून आणल्याचे तपासात कबूल केले. ही वाहने पोलिसांनी आरोपीकडून जप्त करून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. पाचही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

Web Title: Motorcycle, rickshaw puller in Karjat police custody; Performance of Crime Disclosure Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस