शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नमंडपात पोहोचला नवरदेव पण क्षणात झालं होत्याचं नव्हतं; सप्तपदी आधीचं झाला गोळीबार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 12:21 IST

Crime News : वरात घेऊन नवरा मुलगा हा नवरीकडे आला असता काही लोकांनी त्याला गोळी मारली. यामध्ये नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मो

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. लग्नमंडपात नवरदेव पोहचताच एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. सप्तपदी आधीचं गोळीबार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. वरात घेऊन नवरा मुलगा हा नवरीकडे आला असता काही लोकांनी त्याला गोळी मारली. यामध्ये नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोतिहारीमधील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुरली गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बाईक वरून आलेल्या आरोपींनी नवरदेवावर गोळीबार केला आणि ते पसार झाले. घटनेने एकच खळबळ उडाली. लग्नमंडपात यामुळे गोंधळ झाला आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नवरदेवाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गोळीबाराचा आवाज ऐकून लग्नासाठी उपस्थित असलेल्या लोकांनी खूपच आरडाओरडा सुरू केला. काही वेळ गोंधळाचं वातावरण आणि लोकांची धावाधाव सुरू होती. 

मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेवाच्या कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. नवरदेवावर नेमका का गोळीबार करण्यात आला याचा पोलीस शोध घेत असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  उत्तर प्रदेशच्या एटामध्ये एक अजब घटना घडली आहे. नवरी एक आणि वराती दोन असं काहीसं पाहायला मिळालं आहे. लग्न मंडपात एकाच मुलीसोबत लग्न करण्यासाठी चक्क दोन वराती आल्या. त्यानंतर हैराण करणारी बाब म्हणजे नवरीने आधी आलेल्या नवरदेवाच्या गळ्यात हार घातला आणि नंतर आलेल्या नवरदेवासोबत सात फेरे घेऊन नांदायला गेली. या प्रकाराने वऱ्हाडी मात्र चांगलेच चक्रावून गेले आहेत. 

एका लग्नाची अजब गोष्ट! नवरी एक आणि वराती दोन; एकाच्या गळ्यात घातला हार, दुसऱ्यासोबत नांदायला

उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील सिरांव या गावात ही अजब घटना घडली आहे. सिरांवमध्ये एक नवरदेव वरात घेऊन नवरीच्या घरी आला. त्यामुळे नवरीने नवरदेवाच्या गळ्यात हार घातला. त्यानंतर काही वेळाने तिच्या घरी दुसरी वरात आली. तेव्हा नवरीने ज्याच्या गळ्यात हार घातला तो नवरदेव वयाने मोठा असल्याचं सांगून त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या नवरदेवाबरोबर सात फेरे घेतले आणि त्याच्याबरोबर नांदायला गेली. यामुळे आधी आलेली वऱ्हाडी मंडळी संतप्त झाली आणि त्यांनी गोंधळ घातला. मुलाकडच्यांनी नवरी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी मुलीचे वडील आणि काका यांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे. सिरांव गावातील या लग्नाची सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा रंगली आहे.

टॅग्स :marriageलग्नBiharबिहारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी