आईची क्रूर हत्या, चिमुरड्याचा मृतदेह मगरीच्या जबड्यात; अंगावर शहारे आणणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 13:19 IST2023-04-02T13:18:55+5:302023-04-02T13:19:32+5:30
पशुनचा मृतदेह सापडल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी डेल होम्स पार्क येथे घरापासून जवळपास १० किमी अंतरावर २ वर्षाच्या टेलेनचा मृतदेह मगरीच्या जबड्यात असल्याचं समोर आले.

आईची क्रूर हत्या, चिमुरड्याचा मृतदेह मगरीच्या जबड्यात; अंगावर शहारे आणणारी घटना
एका दुर्दैवी घटनेत पोलिसांना २ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह मगरीच्या जबड्यात आढळला. फ्लोरिडाच्या सेंट पीटर्सबर्गचे हे प्रकरण आहे. ज्याठिकाणी गुरुवारी सकाळी सर्वात आधी २० वर्षीय Pashun Jeffery महिलेचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटमध्ये आढळला. या महिलेची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. याठिकाणाहून बेपत्ता मुलाचा शोध पोलिसांनी सुरू केला. महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. परंतु तपासात मुलासोबत अधिक भयंकर कृत्य झाल्याचं उघड झाले.
पशुनचा मृतदेह सापडल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी डेल होम्स पार्क येथे घरापासून जवळपास १० किमी अंतरावर २ वर्षाच्या टेलेनचा मृतदेह मगरीच्या जबड्यात असल्याचं समोर आले. अधिकाऱ्यांनी मगरीला बेशुद्ध करून मृतदेह ताब्यात घेतला, तो टेलेन असल्याची पुष्टी केली. इतक्या क्रूरपणे टेलेनचा मृतदेह आढळल्याने पोलीसही हैराण झाले.
वडिलांवर आई-लेकाची हत्या केल्याचा आरोप
सध्या या प्रकरणी टेलेनचे वडील २१ वर्षीय थॉमस मोस्ले यांच्यावर फस्ट डिग्री मर्डरचा आरोप करण्यात आला आहे. एनबीसी न्यूजनुसार पोलिसांनी जेव्हा थॉमसचा शोध सुरू केला तेव्हा तो हाताला जखम झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता.
अत्यंत क्रूरपणे दोघांचा मृत्यू
कुटुंबातील लोकांनी बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजता आई-मुलाला अखेरचं पाहिले होते. त्यानंतर शेजाऱ्यांनी सांगितले की, रात्री ८.३० च्या सुमारास त्यांच्या घरातून मोठमोठ्याने आवाज येत होता. परंतु पोलिसांना बोलावले नाही. या गोंधळात थॉमसच्या हाताला झालेली जखम घेऊन तो बाहेर पडला आणि त्याच्या आईच्या घरी पोहचला. परंतु सकाळी पशुन कॉल उचलत नसल्याने आईने अपार्टमेंटच्या मॅनेजरला फोन केला तेव्हा एका कर्मचाऱ्याने पशुनचा मृतदेह पाहिला. पशुनची हत्या निर्घृणपणे केली होती. सध्या पोलिसांनी या प्रकरणात तपासाला सुरुवात केली असून पशुनची हत्या कधी आणि केव्हा झाली. त्यानंतर टेलेनचा मृतदेह मगरीच्या जबड्यात कसा आला याचा शोध घेत आहे.