शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती आई;महिलेची शिर धडापासून केलं वेगळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 20:57 IST

Murder case : या हत्येमागे जुने शत्रुत्व किंवा लूटमारीची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देरात्री साडेआठच्या सुमारास जेव्हा तो आला तेव्हा त्याने पाहिले की, आई अंगणात रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती.

रोहतकच्या मस्तनाथ नगरमध्ये शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुध डेअरीमध्ये एका महिलेची धारदार शस्त्राने हत्या केली. ४५ वर्षीय महिला सुनीताचा मृतदेह घराच्या अंगणात रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. रात्री उशिरापर्यंत पोलीस या घटनेच्या तपासात व्यस्त होते. या हत्येमागे जुने शत्रुत्व किंवा लूटमारीची शक्यता नाकारता येत नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्तनाथ नगर येथे राहणाऱ्या आनंदने घराच्या आत दुध डेअरी उघडली असून त्यात तो पाच-सहा म्हशी ठेवतो. संध्याकाळी त्याचा मुलगा दूध पुरवठा करण्यासाठी गेला. रात्री साडेआठच्या सुमारास जेव्हा तो आला तेव्हा त्याने पाहिले की, आई अंगणात रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती.जेव्हा मी जवळ गेलो तेव्हा आईची मान शरीराबाहेर होती. त्याने तातडीने आपल्या वडिलांना आणि पोलिसांना याची माहिती दिली. आयएमटी स्टेशन प्रभारी कुलदीप सिंग आपली टीम व सीआयएसमवेत घटनास्थळी पोहोचले. एफएसएल तज्ज्ञ डॉ. सरोज दहिया यांना गुन्हेगारीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. रात्री 10.30 वाजेपर्यंत पोलिस घटनेचे गूढ सोडविण्यात व्यस्त होते.

11 दिवसांत 5 वा खूनगेल्या 11 दिवसात जिल्ह्यातील पाचव्या हत्येनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. 24 मे रोजी एकाच दिवसात तीन खून झाले. जमिनीच्या वादामुळे सांघी व बहु अकबरपूर गावात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला, तर अस्थल बोहार माजरा गावात जुन्या वैमनस्यातून एकाची हत्या झाली. गुरुवारी कथनौर येथील महिलेचा मृतदेह रीठल गावाजवळच्या कालव्यात सापडला. महिलेचे दोन्ही हात बांधले होते. मस्तनाथ नगरमध्ये आता एका महिलेची शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. या घटनांमुळे एकाच खळबळ माजली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmilkदूध