सहा मुलांची आई प्रियकरासोबत गेली पळून, नुकसान भरपाई म्हणून मिळणार होते १५ लाख रूपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 15:08 IST2022-04-15T15:05:50+5:302022-04-15T15:08:43+5:30
Madhya Pradesh : असं सांगितलं जात आहे की, महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे आणि ती तिच्या मुलांसोबत एकटी राहते.

सहा मुलांची आई प्रियकरासोबत गेली पळून, नुकसान भरपाई म्हणून मिळणार होते १५ लाख रूपये
(Image Credit : Aajtak)
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) विदिशामधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे ६ मुलांची आई एका तरूणाच्या प्रेमात पडली आणि ती आपल्या मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली. असं सांगितलं जात आहे की, महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे आणि ती तिच्या मुलांसोबत एकटी राहते.
आजतकच्या रिपोर्टनुसार, ही घटना विदिसातील शमशाबादमधील बाढेर गावातील आहे. ३० वर्षीय महिला आपल्या मुलांना एकटं सोडून तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. मुलांना आधीच वडिलांचा आधार नव्हता. अशात आता आईपण सोडून गेल्याने त्यांच्यावर मोठं संकट आलं आहे. महिलेला पाच मुली आणि एक मुलगा आहे. पोलिसांनी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली आहे.
महिलेच्या पतीच्या बहिणीने तिचं बॅंक अकाऊंट फ्रीज करण्याची मागणी केली आहे. ती म्हणाली की तिच्या भावाचा पाण्याचा टाकीवरून पडून मृत्यू झाला होता. त्याचे तिला १५ लाख रूपये नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहेत. अशात ती तिच्या सहा लेकरांना सोडून शेजारच्या तरूणासोबत पळून गेली. त्यामुळे नुकसान भरपाईचे पैसे तिला मिळून नये असे आम्हाला वाटते.