पतीशी झालेल्या वादानंतर दोन मुलांसह आई बेपत्ता    

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 00:14 IST2020-12-06T00:04:04+5:302020-12-06T00:14:49+5:30

Crime News : विरारच्या पश्चिमेकडील डीमार्ट-जवळील पॅननसुला पार्कमध्ये राहणाऱ्या रिमा किरण म्हात्रे (३३), उत्कर्ष (८) आणि दक्षता (५) हे तिघेही गेल्या  २ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहेत. 

Mother missing with two children after an argument with her husband | पतीशी झालेल्या वादानंतर दोन मुलांसह आई बेपत्ता    

पतीशी झालेल्या वादानंतर दोन मुलांसह आई बेपत्ता    

नालासोपारा : विरार पश्चिमेकडील डी मार्टजवळील इमारतीमध्ये राहणाऱ्या आईसह ८ वर्षांचा मुलगा आणि ५ वर्षांची मुलगी २ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. अर्नाळा पोलिसांनी हरविल्याची नोंद केली असून, त्यांचा शोध घेणयात  येत आहे.

विरारच्या पश्चिमेकडील डीमार्ट-जवळील पॅननसुला पार्कमध्ये राहणाऱ्या रिमा किरण म्हात्रे (३३), उत्कर्ष (८) आणि दक्षता (५) हे तिघेही गेल्या 
२ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहेत.  रिमा यांचा पती किरण यांच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर त्या दोन्ही मुलांसह निघून गेल्या. पतीने आपल्या परीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे  पतीने पत्नी व दोन्ही मुले बेपत्ता असल्याची तक्रार अर्नाळा पोलिसांना दिली आहे.  रिमा किरण म्हात्रे आणि तिच्या दोन्ही मुलांबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी अर्नाळा पोलीस ठाण्याशी ताबडतोब संपर्क साधण्याचे आवाहन अर्नाळा पोलिसांनी  केले आहे.

Web Title: Mother missing with two children after an argument with her husband