शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

नागपुरात मेव्हणीला बनविले आई, नवजात बाळाला बेवारस फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 10:39 PM

अनैतिक संबंधातून जन्म झालेल्या नवजात बाळाला बेवारसपणे फेकल्याची घटना उजेडात आली आहे. गिट्टीखदान पोलिसांनी नवजात बाळाच्या आईचे जावई, चुलत बहिण आणि ननंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देआरोपी जावयास अटक : गिट्टीखदानमधील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अनैतिक संबंधातून जन्म झालेल्या नवजात बाळाला बेवारसपणे फेकल्याची घटना उजेडात आली आहे. गिट्टीखदान पोलिसांनी नवजात बाळाच्या आईचे जावई, चुलत बहिण आणि ननंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गिट्टीखदानच्या दाभामध्ये ही घटना घडली आहे. रामकिसन बेनीराम चौधरी (३५), लक्ष्मी रामकिसन चौधरी (३२) आणि सजावती बेनीराम चौधरी (२२) अशी आरोपींची नावे आहेत. रामकिसन आणि त्याची पत्नी लक्ष्मी मुळचे बालाघाटचे रहिवासी आहेत. सजावती रामकिसनची बहिण आहे. तिघेही नागपुरात मजुरी करतात. रामकिसनला तीन मुले आहेत. तीघेही लहाण असल्यामुळे रामकिसनने लक्ष्मीची चुलत बहिण पुजा (२१) हिला मुलांची देखभाल करण्यासाठी आणले होते. दरम्यान रामकिसनने पुजासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. त्यामुळे पुजा गर्भवती झाली. ती गर्भवती असल्याची बाब लपविण्यासाठी आरोपींनी पुजाचे बाहेर येणे जाणे बंद केले. गुरुवारी पुजाने मुलाला जन्म दिला. आरोपींनी तिची प्रसुती घरातच केली. रुग्णालयात नेण्याऐवजी घरातच प्रसुती केल्यामुळे पुजा आणि बाळाची प्रकृती बिघडली. त्यावरही आरोपी गंभीर झाले नाहीत. त्यामुळे जन्म झाल्यानंतर काही वेळाने बाळाचा जीव गेला. त्यावर आरोपी बाळाची विल्हेवाट लावण्याच्या कामात लागले. आरोपींनी रात्री १२.३० वाजता बाळाला सुखसागर सोसायटीजवळ मातीच्या ढिगावर ठेवले आणि तेथून निघून आले. त्यावर आरोपींच्या शेजाऱ्यांना पुजाची प्रसुती झाल्याची माहिती मिळाली. बाळ दिसत नसल्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी नियंत्रण कक्षाला सूचना दिली. उपनिरीक्षक सावंत सहकाºयांसह तेथे पोहोचले. पुजा बेशुद्ध असल्यामुळे पोलिसांनी आरोपींना बाळाबद्दल विचारना केली. सुरुवातीला ते पोलिसांची दिशाभूल करीत होते. परंतु पोलिसांनी कडक शब्दात विचारना केल्यानंतर त्यांनी खरी माहिती सांगितली. त्या आधारे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून रामकिसनला अटक केली. त्याने पुजाला रुग्णालयात दाखल केले असते तर बाळाचा जीव वाचला असता. आपल्या कृत्यावर पडदा टाकण्यासाठी त्याने बाळाचा जीव घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार