सुनेने केला सासूचा खून, कर्जत तालुक्यातील बेकरे गावातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 01:07 IST2021-02-20T01:06:32+5:302021-02-20T01:07:22+5:30

Crime News : सासू झोपेत असल्याचा फायदा घेत सुनेने घरातील वरवंटा सासूच्या डोक्यात घालून सासूला जीवे मारले. बेकरे गावात राहणाऱ्या तारामती कराळे ह्या पहाटे झोपेत होत्या, तर पती पांडुरंग कराळे लवकर उठून गावात गणपती उत्सव असल्याने घराबाहेर पडले होते.

Mother-in-law killed by daughter-in-low | सुनेने केला सासूचा खून, कर्जत तालुक्यातील बेकरे गावातील घटना

सुनेने केला सासूचा खून, कर्जत तालुक्यातील बेकरे गावातील घटना

 नेरळ : सासूच्या डोक्यात वरवंटा घालून सुनेने खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील बेकरे गावात घडली आहे. तारामती पांडुरंग कराळे (७५) असे या मृत महिलेचे नाव असून, नेरळ पोलिसांनी सुनेला ताब्यात घेतले आहे.
सासू झोपेत असल्याचा फायदा घेत सुनेने घरातील वरवंटा सासूच्या डोक्यात घालून सासूला जीवे मारले. बेकरे गावात राहणाऱ्या तारामती कराळे ह्या पहाटे झोपेत होत्या, तर पती पांडुरंग कराळे लवकर उठून गावात गणपती उत्सव असल्याने घराबाहेर पडले होते. पांडुरंग कराळे हे घरी परतल्यावर ६ वाजण्याच्या सुमारास पत्नीला उठवण्यासाठी गेले असता पत्नी उठत नसल्याने घटना उघडकीस आली. तारामती यांच्या डोक्यात 
जबर मार बसला असून, रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला होता.
यावेळी घरात सून योगीता कराळे कुठे दिसून येत नसल्याने शोध घेतला असता सून घराशेजारी असणाऱ्या जागेत लादी पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रव पदार्थ पिलेल्या अवस्थेत मिळून आली. या घटनेबाबत सुनेला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हत्येमागचे नेमके कारण समजू शकले नसल्याने पोलीस अधिक तपास करीत आहेत. 
  योगीता हीस मुलगा व मुलगी असून, पती योगेश कराळे यांचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. या घटनेने गावामध्ये खळबळ माजली 
आहे.
 

Web Title: Mother-in-law killed by daughter-in-low