घरजावई म्हणून राहायला आला, सासूच्या प्रेमात वेडा झाला; पुढे भलताच प्रकार केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:55 IST2021-12-22T16:46:27+5:302021-12-22T16:55:20+5:30
तो अनेक महिन्यांपासून घर जावई म्हणून राहू लागला होता आणि याच दरम्यान सासू आणि जावयात जवळीक वाढली.

घरजावई म्हणून राहायला आला, सासूच्या प्रेमात वेडा झाला; पुढे भलताच प्रकार केला
प्रेम एक अशी गोष्ट आहे ज्याला कशाचंही बंधन नसतं. लोक प्रेमात पडतात तेव्हा पार आंधळे होऊन जातात. प्रेमात आंधळे झालेले लोक काय करतात याच्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. कधी एखादा तरूण आपल्या नातेवाईक महिलेसोबत फरार होतो. तर कधी आणखी काही ऐकायला मिळतं. मात्र, पश्चिम बंगालमधून याहून एक विचित्र घटना समोर आली आहे. हावडामधील एक जावई आपल्या सासूसोबत फरार झाल्याची घटना समोर आली आहे.
सासरा आणि पत्नी केली तक्रार
पश्चिम बंगालच्या लोकल मीडियानुसार, २०१६ मध्ये शिफाली दासची मुलगी प्रियंका दासचं रामपुरहाट येथे राहणाऱ्या कृष्ण गोपास दाससोबत लग्न झालं होतं. पण झालं असं की, गेल्या शनिवारी शिफाली दास आपल्या मुलीच्या नवऱ्यासोबत म्हणजे जावयासोबत पळून गेली. कथितपणे दोघांमध्ये बऱ्याच वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सासरा बबला दास आणि तिची मुलगी प्रियंका दासने लिलुआ पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सासूला घेऊन पळून गेलेल्या कृष्ण गोपाल दासच्या पत्नीचा आरोप आहे की, लग्नानंतर तिचा पती तिला मारहाण करत होता आणि शिवीगाळही करत होता.
पत्नीने विरोध केला तर पतीने केली मारहाण
प्रियंकाने आरोप केला की, जेव्हा तिला पती आणि आईच्या संबंधाबाबत समजलं तेव्हा तिने याचा विरोध केला. त्यानंतर पतीने मारहाण केली. प्रकरण जेव्हा वाढलं तर आरोपी पती आपल्या पत्नीला सोडून आपल्या सासरी जाऊन राहून राहला होता. आरोप आहे की, सासरी तो अनेक महिन्यांपासून घर जावई म्हणून राहू लागला होता आणि याच दरम्यान सासू आणि जावयात जवळीक वाढली. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.