शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रा़यणी नदीमध्ये फेकून देत दोन मुलांचा खून करणाऱ्या आईला जन्मठेप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 19:39 IST

पतीने आणलेले चिकन शिजवण्यास नकार दिल्यानंतर उद्भवलेल्या वादामधून पत्नीने दोन मुलांना पुलावरुन इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिल्याची घटना मे महिन्यात होती.

ठळक मुद्देकौटुंबिक कारण : पतीसोबत चिकन बनविण्यावरुन झाला होता वाद 

पुणे : पतीने आणलेले चिकन शिजवण्यास नकार दिल्यानंतर उद्भवलेल्या वादामधून पत्नीने दोन मुलांना पुलावरुन इंद्रायणी नदीमध्ये फेकून त्यांचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना मावळ  तालुक्यातील आंबी येथे घडली होती. मुलांना फेकल्यानंतर तिनेही पाण्यामध्ये उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला स्थानिक महिलांनी वाचविले होते. ही घटना २२ मे २०१८ रोजी घडली होती. अतिरीक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी हा आदेश दिला. अवघ्या पाच महिन्यात हा निकाल लागला आहे. शकुंतला अवधेश केवट (वय २८, रा. नानोली, ता. मावळ, पुणे, मुळ रा. महुंगज, मध्यप्रदेश) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती अवधेश जगन्नाथ केवट यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेत अमन अवधेश केवट (वय ०४) व अमर अवधेश केवट (दीड वर्ष) यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे २०१८ रोजी अवधेश यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवणासाठी चिकन आणले होते. त्यांनी शकुंतला हिला चिकन शिजवण्यास सांगितले. मात्र, तिने जेवण बनविण्यास नकार दिला होता. यावरुन त्यांच्यामध्ये भांडणे झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वाद शांत झाल्यावर त्यांना डबा करुन दिला. मात्र, अवधेश कामावर गेल्यावर भांडणाच्या रागामधून तिने दोन्ही मुलांना सोबत घेऊन आंबी येथील पुल गाठला. आधी अमन याला नदीपात्रात फेकले. त्यानंतर अमर याला पाण्यात फेकून दिले. पाण्यात बुडाल्याने या दोघांचाही मृत्यू झाला. पाठोपाठ तिने नदीमध्ये उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहिलेल्या तीन ते चार जणांनी तिला पाण्यात उड्या घेऊन वाचविले होते. याप्रकरणामध्ये सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी सहा साक्षीदार तपासले. घटनेच्यावेळी संबंधित ठिकाणी एक मासेमारी करणारा, आंघोळीसाठी नदीवर आलेला व नगरपालिकेचा कर्मचारी उपस्थित होता. दोन प्रत्यक्षदर्शींनी न्यायालयात नोंदविलेली साक्ष महत्वपूर्ण ठरली. बचाव पक्षाच्या वकीलांनी याप्रकरणात युक्तिवाद करताना, तिचे शरीरातील साखरेचे प्रमाण होऊन चक्कर आल्याने ती नदीपात्रात पडली होती. तसेच तिला वाचविण्याकरिता दोन्ही मुलांनी नदीत उडी मारल्याचा बचाव केला होता. मात्र, आरोपी महिला ही शारीरिक व मानसिकदृष्टया सक्षम असल्याचा वैद्यकीय अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांनी केला.

टॅग्स :mavalमावळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMurderखूनjailतुरुंगPoliceपोलिस