आईच ठरली वैरीण! दीड महिन्याच्या चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी मातेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 21:34 IST2020-12-04T21:26:25+5:302020-12-04T21:34:54+5:30
Crime News : आज न्यायालयासमोर हजर करणार : राजापेठ पोलिसांची माहिती

आईच ठरली वैरीण! दीड महिन्याच्या चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी मातेला अटक
अमरावती : दीड महिन्याच्या चिमुकल्याचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याच्या न्यू प्रभात कॉलनी येथील प्रकरणात राजापेठ पोलिसांनी त्याची आई नम्रता (२९) हिला शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अटक केली. तिला शनिवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.
प्रसूतीसाठी माहेरी न्यू प्रभात कॉलनी येथे वडिलांकडे आलेल्या नम्रताच्या दीड महिन्याच्या चिमुकल्याचे रविवारी अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. सोमवारी सकाळी घराच्या अंगणातील विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोेलिसांनी खुनाच्या गुन्ह्याचे कलम वाढविले आणि या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली. परिस्थीतजन्य पुराव्यानुसार या प्रकरणात संशयाची सुई पूर्वीपासूनच मृताच्या मातेवर होती. त्यानुसार तिला अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे शहरात न्यू प्रभात कॉलनीसह शहरात खळबळ उडाली होती.
नम्रताला पोलीस शनिवारी न्यायालयासमोर हजर करतील व तिच्या पोलीस कोठडीची मागणी करतील. तिने अद्याप गुन्ह्याची कबुली दिली नसली तरी पोलीस चौकशीत ती मिळण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात केलेल्या चौकशीअंती तसेच परिस्थितीजन्य पुराव्यावरून मृत चिमुकल्याच्या आईला शुक्रवारी अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
आरती सिंह, पोलीस आयुक्त