माता न तू वैरिणी... काळजी घेण्याचा कंटाळा आल्यानं दोन महिन्यांच्या चिमुरडीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 17:15 IST2020-01-29T17:07:18+5:302020-01-29T17:15:29+5:30

तोंडाला चिकटपट्टी लावून मृतदेह मॅनहोलमध्ये टाकला

mother arrested for killing her baby Body found in manhole | माता न तू वैरिणी... काळजी घेण्याचा कंटाळा आल्यानं दोन महिन्यांच्या चिमुरडीची हत्या

माता न तू वैरिणी... काळजी घेण्याचा कंटाळा आल्यानं दोन महिन्यांच्या चिमुरडीची हत्या

कोलकाता: पोटच्या चिमुरड्या मुलीची हत्या करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. दोन महिन्यांच्या मुलीच्या तोंडाला चिकटपट्टी लावून महिलेनं तिला एका मॅनहोलमध्ये टाकलं. त्यानंतर तिनं मुलीचं अपहरण झाल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. मात्र अखेर पोलीस चौकशीत सत्य बाहेर आलं. स्वत:च्याच बाळाची हत्या करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. 

कोलकात्यामधील फूलबागन परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय संध्या मालोनं रविवारी स्वत:च्या मुलीची हत्या केली. कुटुंबातले इतर सदस्य घरी नसल्याचं पाहून संध्यानं मुलीच्या तोंडावर चिकटपट्टी लावली. त्यानंतर तिनं मुलीला तळमजल्यावर असलेल्या मॅनहोलमध्ये टाकलं. दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर काही वेळातच तिचे सासरे घरी परतले. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीनं घरात घुसून मुलीला पळवल्याचं संध्यानं सासऱ्यांना सांगितलं.

थोड्या वेळानं याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी संध्यासह इमारतीच्या सुरक्षारक्षकाची चौकशी केली. यावेळी संध्या देत असलेल्या माहितीत तफावत आढळून आली. पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केल्यावर संध्यानं खुनाची कबुली दिली. 'बाळाचा कंटाळा आल्यानं हत्या केल्याचं संध्यानं चौकशीत सांगितलं. संध्यानं हत्येची कबुली दिल्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली,' अशी माहिती पोलिसांनी दिली. 
 

Web Title: mother arrested for killing her baby Body found in manhole