स्वत:च्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या आईला गोव्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 21:05 IST2020-10-18T21:05:05+5:302020-10-18T21:05:54+5:30

Crime News : महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बिगर राजकीय संस्थेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी तक्रार नोंदविली आहे.

Mother arrested in Goa for pushing her daughter into prostitution | स्वत:च्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या आईला गोव्यात अटक

स्वत:च्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या आईला गोव्यात अटक

मडगाव - जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकल्याची एक घटना गोव्यात उघडकीस आली आहे. राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील मायणा कुडतरी पोलीस ठाण्याच्या अख्यत्यारीत वरील घटना घडली असून संशयितावर गुन्हा नोंद करुन पोलिसांनी तिला अटक केली आहे.

बायलाचो एकवोटच्या या महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बिगर राजकीय संस्थेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी तक्रार नोंदविली आहे. पीडीत युवती अल्पवयीन असून या प्रकरणी अन्य एक जण सदया फरार असून, त्याचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भादंसंच्या ३७६, ३७६ (अ) (ब) व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गंत पोलिसांनी संशयित महिलेवर गुन्हा नोंद केला आहे. या महिलेला पोलिसांनी यापूर्वी एका चोरी प्रकरणात अटक केली होती. सदया ती पोलीस कोठडीत आहे. गेले काही वर्षे तिने आपल्या मुलीला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलले होते. पीडितेबद्दल बायलाचो एकवोटच्या अध्यक्ष व्हिएगस यांना माहिती मिळाल्यानंतर मागाहून पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली.

Web Title: Mother arrested in Goa for pushing her daughter into prostitution