शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेतून पडून माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 23:20 IST

Accident : भंडारा जिल्ह्यात माडगी-देव्हाडा वैनगंगा रेल्वे पुलावरील घटना

करडी (भंडारा) : नागपूरहून रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने जात असलेल्या माय-लेकाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना देव्हाडा - माडगी वैनगंगा नदी पुलावर घडली. ही घटना सोमवारी दुपारी रेल्वे कर्मचाऱ्यांमुळे उघडकीस आली. 

पूजा इशांत रामटेके (२७) व अथर्व इशांत रामटेके (१८ महिने) रा. टेकानाका (नागपूर) मृत माय-लेकाचे नाव आहे.  सैनिक असलेला इशांत रामटेके रा. टेकानाका नागपूर हा सुटी संपल्याने कुटुंबासह नागपूर रेल्वेस्थानकाहून रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने निघाला होता. तुमसर रेल्वे स्थानकावरून गाडी पुढील प्रवासात असताना पत्नीला लघुशंका लागल्याने पतीला सांगून ती दीड वर्षाच्या मुलासह रेल्वे डब्यातील प्रसाधनगृहाकडे गेली. त्यावेळी मुलगा धावत-धावत समोर गेला. काही कळण्याच्या आतच माडगी व देव्हाडा दरम्यान वैनगंगा नदी रेल्वे पुलावरुन नदीत पडला. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात महिलेचा तोल जावून ती सुद्धा रेल्वे पुलावर कोसळली. या घटनेत दीड वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर महिलेला पुलाचा मार लागून लटकलेल्या स्थितीत ठार झाली. ही घटना रात्रीदरम्यान घडल्याची प्राथामिक माहिती पोलीसांनी दिली.

बराचवेळा झाल्यानंतरही पत्नी व मुलगा परत न आल्याने पतीने धावत्या रेल्वेत शोधाशोध केली. परंतू शोध न लागल्याने त्याने गोंदिया येथे पत्नी व मुलगा हरविल्याची तक्रार नोंदविली.

सोमवारी रेल्वे कर्मचारी पेट्रोलिंगवर असतांना दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांना एका महिलेचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत तर मुलाचा मृतदेह नदीत आढळून आला. घटनेची माहिती रेल्वे पोलीस व करडी पोलीसाना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. इशांत रामटेके यांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर शव उत्तरीय तपासणीसाठी तुमसर येथे पाठविण्यात आले. तपास करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश वाजे यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.

टॅग्स :AccidentअपघातnagpurनागपूरDeathमृत्यूrailwayरेल्वे